मुसळगाव : सिन्नर तालुक्यातील मुसळगाव येथील प्रसिद्ध मुसळेश्वर मंदिर यात्रा समितीच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गंगेतून ग्रामस्थांनी पायी आणलेल्या जलाने जलाभिषेक करण्यात आला. दरवर्षी तरुण, अबालवृद्ध पायी जात गोदावरी नदीतून खांद्यावर कावड घेऊन भक्तिभावाने पवित्र जल घेऊन येत असतात.सोमवारी पहाटे पायी आलेले कावडधारकांची वाजत-गाजत मुसळेश्वराच्या जयघोषात कावडधारकांचे स्वागत करण्यात आले. यावेळी महिलावर्ग घरासमोर सडासंमार्जन करून रांगोळी काढतात. त्यानंतर प्रत्येक कावडधारकाचे औक्षण करण्यात आले. वरचे मुसळगाव ते खालचे मुसळगाव अशी कावडधारकांची मिरवणूक मार्गक्रमण करत मुसळेश्वर मंदिराच्या पटांगणात एकत्र येतात. त्यानंतर मुसळेश्वराला जलाभिषेक घालण्यात येतो. दुसऱ्या दिवशी मंगळवारी रात्री ८ ते १० शोभेच्या दारूची आतषबाजी केली जाणार आहे. रात्री ९ वाजता सुनीलकुमार सह चंदाराणी औरंगाबादकर यांचा लोकनाट्य तमाशा होणार आहे. बुधवारी सायंकाळी ४ ते ६ भव्य कुस्त्यांची दंगल आयोजित केली आहे. रात्री संगीता महाडिक पुणेकरसह संजय महाडिक यांचा तमाशाचे आयोजन करण्यात आले आहे.
मुसळगावला कावड मिरवणूक उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 17:43 IST
मुसळगाव : सिन्नर तालुक्यातील मुसळगाव येथील प्रसिद्ध मुसळेश्वर मंदिर यात्रा समितीच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले ...
मुसळगावला कावड मिरवणूक उत्साहात
ठळक मुद्दे मुसळगाव : सिन्नर तालुक्यातील मुसळगाव येथील प्रसिद्ध मुसळेश्वर मंदिर यात्रा समितीच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.