नाशिक : कुणी नंदुरबारहून आलेले, कुणी धुळ्याहून तर कुणी पुण्यातून आणि कुणी कोकणातून परीक्षेसाठी आलेल्या परीक्षार्थींना नाशिकमध्ये आल्यावर शुक्रवारी रात्री परीक्षा पुढे ढकलल्याचे समजले. त्यातही कोणतीही पूर्वकल्पना नसलेले जिल्हाबाह्य परीक्षार्थी तर सर्व सज्जता ठेवूनही ऐनवेळी परीक्षा पुढे ढकलल्याचे कळालेल्या जिल्ह्यातील परीक्षार्थींनी शासनाच्या निर्णयाविरोधात रोष आणि संताप व्यक्त केला.
राज्य शासनाच्या आरोग्य विभागातील गट क आणि गट ड मधील पदे भरतीसाठी शनिवारी (दि. २५) आणि रविवारी (दि. २६) लेखी परीक्षा होणार होती. परीक्षेची सर्व तयारी पूर्ण झाली असून विद्यार्थ्यांना हॉल तिकिटांचे देखील वाटप करण्यात आले होते. मात्र,अनेक परीक्षार्थीच्या हॉल तिकिटावर विविध चुका आढळून येत आहेत. बहुतांश विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटावर परीक्षा केंद्रांचा पत्ता
चुकीचा होता. तर काही हॉल तिकिटांवर परीक्षा केंद्र किंवा इतर माहिती देताना स्पेलिंग चुकीचे छापले गेले आहे. परीक्षेसाठी बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांचा त्यामुळे गोंधळ उडत होता.
इन्फो
हॉल तिकिटावर गंभीर चुका
नाशिकमधील एका विद्यार्थ्याला सटाणा येथील ताहराबाद रोडवरील परीक्षा केंद्र मिळाले आहे; मात्र त्याच्या हॉल तिकिटावर ‘जहाराबाद रोड’असे छापून आले होते. सटाणा नावाचे स्पेलिंगदेखील ‘सतना’ असे चुकीचे होते. तर काही विद्यार्थ्यांच्या नावातदेखील गंभीर चुका असल्याची तक्रार विद्यार्थ्यांकडून केली जात होती. बहुतांश विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटावर परीक्षा केंद्रांचा पत्ता देताना स्पेलिंगच्या चुका आढळून येत आहेत. काही चुका किरकोळ असल्याने अंदाज येऊ शकतो; मात्र काही चुका गंभीर स्वरूपाच्या असल्याने पत्ता नेमका कुठला आहे, याविषयी संभ्रम निर्माण होतो. शनिवार आणि रविवारच्या परीक्षेसाठी जिल्ह्यात ५१ हजार ९९९ परीक्षार्थी होते. त्यात क गटासाठी एकूण ९४ केंद्रांवर ३३ हजार ९६८ परीक्षार्थी होते. तर रविवारच्या ड गटासाठी एकूण ५६ केंद्रांवर १८ हजार ३१ परीक्षार्थी परीक्षा देणार होते.
कोट
कोरोनाकाळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. तरुण बेरोजगार हतबल झाले आहेत. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, ऐनवेळी रद्द करून सरकारने परीक्षार्थींना तोंडावर पाडले आहे. सरकार विद्यार्थ्यांच्या करिअरशी खेळत असून भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
- पंढरीनाथ पाटील, परीक्षार्थी
--------
चार महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे अचानक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा रद्द करण्यात आली होती. त्यानंतर अनेक बेरोजगार तरुणांनी आत्महत्या केल्या; मात्र तरीही यंत्रणेला जाग येत नाही. परीक्षेच्या काही तास अगोदर परीक्षा रद्द करून सरकार परीक्षार्थींच्या भावनेशी खेळत आहे, ही निषेधार्ह बाब आहे.
- दत्ता कापसे, परीक्षार्थी
-----------------
फोटो
कोटचे फोटो तारखेसह संपूर्ण नावाने
२५दत्ता कापसे
२५पंढरीनाथ पाटील