शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 00:30 IST

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा होणार की नाही, अशी शंका पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये उपस्थित होत आहे. मात्र, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार असून, राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा असल्यामुळे त्या केंद्रीय संस्थांच्या मार्गदर्शनाखाली होत असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

ठळक मुद्देअमित देशमुख : महाविद्यालयांना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याचे आवाहन

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा होणार की नाही, अशी शंका पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये उपस्थित होत आहे. मात्र, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार असून, राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा असल्यामुळे त्या केंद्रीय संस्थांच्या मार्गदर्शनाखाली होत असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वैद्यकीय शिक्षण विभागाशी संलग्नित महाविद्यालयातील सोयी-सुविधा रुग्णांकरिता उपलब्ध करुन देण्यासंदर्भात मंत्रालयात बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. आरोग्य संचालक डॉ. तात्याराव लहाने, आयुष संचालनालयाचे संचालक डॉ. के. आर. कोहली, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांच्यासह राज्यभरातील पाचशेहून अधिक डॉक्टर्स या बैठकीत सहभागी झाले होते.कोविडच्या दुसऱ्या लाटेवरही मात करुकोरोनाची पहिली लाट ओसरली असे चित्र निर्माण झाले होते. मात्र, आता दुसरी लाट आहे. अशा परिस्थितीत कोरोनाशी सामना करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण, आयुर्वेदिक, होमिओपॅथी, नर्सिंग, डेंटल, फिजिओथेरपी या महाविद्यालयांनी चांगले कार्य केले आहे. दुसरी लाट थोपविण्यासाठी यापुढेही संपूर्ण ताकदीनिशी कोरोनावर मात करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन अमित देशमुख यांनी केले आहे.महाविद्यालयांनी कोविड नियमांचे पालन करावेवैद्यकीय शिक्षण विभागाशी संलग्नित महाविद्यालयांनी शासनाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचना आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे असून, याबाबत संस्थांनी गांभीर्यपूर्वक दक्षता घेतली पाहिजे. त्याचबरोबर संस्थेत कोणालाही कोरोनाची लागण होणार नाही, याची काळजी घ्यावी. तसेच ज्यांचे लसीकरण झालेले नाही त्यांचे लसीकरण तातडीने करुन घ्यावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. दरम्यान, रुग्णसंख्या वाढत असली तरी लसीकरणही मोठ्या प्रमाणात झाले पाहिजे, अशी शासनाची भुमिका असून, लसीची कमतरता भासणार नाही, यासाठी दक्षता घेतली जात आहे. लसींचा जास्तीत जास्त पुरवठा व्हावा, याकरिता केंद्र सरकारकडे सातत्याने प्रयत्न केले जात असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

टॅग्स :Studentविद्यार्थीexamपरीक्षा