येवल्यात रूग्ण तेथे तपासणी मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 09:56 PM2021-03-23T21:56:07+5:302021-03-24T00:36:03+5:30

येवला : शहरातील वाढत्या रूग्ण संख्येच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर आले आहे. नगरपालिका, उपजिल्हा रूग्णालय, पंचायत समिती आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रूग्ण तेथे तपासणी मोहीम राबविली जात आहे.

Examination of patients in Yeola | येवल्यात रूग्ण तेथे तपासणी मोहीम

येवल्यात रूग्ण तेथे तपासणी मोहीम

Next
ठळक मुद्देसंपर्कातील नागरिकांच्या कोरोना चाचण्या करण्याचे निर्देश

येवला : शहरातील वाढत्या रूग्ण संख्येच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर आले आहे. नगरपालिका, उपजिल्हा रूग्णालय, पंचायत समिती आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रूग्ण तेथे तपासणी मोहीम राबविली जात आहे.

ज्या भागात कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहे, त्या भागात संपर्कातील नागरिकांच्या कोरोना चाचण्या करण्याचे निर्देश आरोग्य विभागाकडून प्राप्त झाले असून त्यानुसार मंगळवारी (दि.२३) शहरातील नवजीवन कॉलनी तसेच परिसरातील भाजीपाला विक्रेते, इतर दुकानदार यांच्या आरोग्य विभागाच्या पथकाने कोरोना चाचण्या करण्यात आल्या.

याप्रसंगी गटविकास अधिकारी डॉ. उमेश देशमुख, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हितेंद्र गायकवाड, मुख्याधिकारी संगीता नांदुरकर आदी अधिकारी उपस्थित होते. (२३ येवला कोरोना)

Web Title: Examination of patients in Yeola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.