शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येकाने शांतीचा प्रचार करणारे देवदूत व्हावे : बिशप लुर्ड्स डॅनिएल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 00:56 IST

शांती प्रस्थापित करणारी ही खरी देवाची मुले असतात. हिंसक आणि युद्धखोर प्रवृत्तीची माणसे ईश्वरी कृपेपासून दूर केलेली असतात. शत्रूला जिंकण्यासारखा पराक्रम नाही. शत्रूला मित्र करण्यासारखा महान पराक्रम दुसरा नाही.

नाशिकरोड : शांती प्रस्थापित करणारी ही खरी देवाची मुले असतात. हिंसक आणि युद्धखोर प्रवृत्तीची माणसे ईश्वरी कृपेपासून दूर केलेली असतात. शत्रूला जिंकण्यासारखा पराक्रम नाही. शत्रूला मित्र करण्यासारखा महान पराक्रम दुसरा नाही. जगभरातील प्रत्येक नागरिकाने युद्ध सोडून शांतीचा प्रचार करणारे देवदूत व्हावे, असा संदेश नाताळ सणानिमित्त नाशिक कॅथोलिक धर्मप्रांताचे मुख्य बिशप लुर्ड्स डॅनिएल यांनी दिला. नाताळ सणानिमित्त सोमवारी रात्री १० वाजता जेलरोड येथील संत अण्णा महामंदिरामध्ये उपस्थिताना संदेश देताना मुख्य बिशप लुडर््स डॅनिएल म्हणाले की, आजच्या अशांत व युध्दखोर जगात प्रभू येशूचा आदर्श समोर ठेवून प्रत्येकाने शांतीदूताच्या भूमिकेत कार्य केल्यास जगात शांती निर्माण होईल. मृत्यूप्रसंगी प्रभू येशू म्हणाले होते, स्वर्गीय पित्या मला ठार मारणाऱ्या माझ्या बांधवांना क्षमा कर. कारण ते काय करत आहेत, याची त्यांना जाणीव नाही. प्रभू येशूंनी मृत्यूप्रसंगीसुद्धा आपली दयाबुद्धी दाखविली होती. अशीच दयाबुद्धी सर्वांनी बाळगावी,असे प्रतिपादन मुख्य बिशप लुर्ड्स डॅनिएल यांनी केले.  नाताळ सणानिमित्त सोमवारी मध्यरात्री जेलरोड संत अण्णा महामंदिर, मुक्तिधाम समोरील सेंट फिलीप चर्च, नाशिक-पुणे महामार्गावरील बाळ येशू देवालय या ठिकाणी ख्रिस्ती बांधवांनी प्रभू येशूच्या जन्माची सामूहिक प्रार्थना म्हटली. ख्रिस्ती बांधवांनी एकमेकांना आलिंगन देत नाताळ सणाच्या शुभेच्छा दिल्या.प्रभू येशूच्या जन्माचा देखावानाताळ सणानिमित्त चर्चला रंगरंगोटी करून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तसेच आकाशकंदील लावण्यात आला होता. चर्चच्या परिसरात प्रभू येशूच्या जन्माचा गव्हाणीचा देखावा साकारला होता.

टॅग्स :ChristmasनाताळNashikनाशिक