शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येकाने परमात्म्याचा ध्यास घ्यावा : साध्वी सुशीलकुवरजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 01:07 IST

पर्वाधिराज पर्यूषण पर्वाचे मंगलमय आगमन झाले आहे. ५व्या दिवसाचा सूर्य उदित झाला आहे. दान, शील, तप यावर आकृष्ट आराधना केली पाहिजे. प्रत्येकाने परमात्म्याचा ध्यास धरावा, असे आवाहन जैन साध्वी सुशीलकुवरजी म.सा. यांनी केले.

नाशिक : पर्वाधिराज पर्यूषण पर्वाचे मंगलमय आगमन झाले आहे. ५व्या दिवसाचा सूर्य उदित झाला आहे. दान, शील, तप यावर आकृष्ट आराधना केली पाहिजे. प्रत्येकाने परमात्म्याचा ध्यास धरावा, असे आवाहन जैन साध्वी सुशीलकुवरजी म.सा. यांनी केले. चोपडा लॉन्स येथे सुरू असलेल्या पर्यूषण पर्वाच्या विशेष व्याख्यानात त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, भरपूर आराधना करून देवाला आपण चरणी नतमस्तक असल्याचे सांगावे. अनुमोदनकरुन तीर्थंकर गोत्र उपार्जन केले पाहिजे. आपल्याला परमात्म्यासारखे काम करायचे आहे हे आपल्या जीवनाचे ध्येय असले पाहिजे. महावीरांच्या संदेशाने अनेकांच्या जीवनात परिवर्तन केले आहे.  दान व मानवाची महिमा त्यांनी एका गोष्टीद्वारे स्पष्ट केली. त्यांनी सांगितले, एक दाम्पत्य घरी येणाऱ्या प्रत्येकाला चहा, नाष्टा, जेवण देत असे. एका रात्री चोरी करायला चोर आले होते. जाग आल्यानंतर घरातील स्त्रीने त्यांना ‘जेवल्याशिवाय जाऊ नका’ असा आग्रह केला. जेवल्यावर ते चोर खूप आनंदीत झाले. गरिबी व घरातील सदस्यांच्या गरजा भागविण्यासाठी आपण चोरी करत असल्याचे त्यांनी कबूल केले. आदरतिथ्य, दिलेला मान पाहून त्यांचे मन परिवर्तन झाले.  चोपडा लॉन्स येथे सुरू असलेल्या पर्यूषण पर्वाच्या विशेष व्याख्यानात जैन साध्वी सुशीलकुवरजी म.सा. यांनी प्रवचनामध्ये भगवान महावीरांच्या जीवनातील तसेच विविध संदेशाची उदाहरणे दिली.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमNashikनाशिक