नाशिक : महापालिका स्थायी समितीवर दरवर्षी नवीन सदस्याला संधी देण्याचा शिवसेना-मनसेने राबविलेला फार्मुला आता पक्षाच्याच अंगलट आला असून, एक वर्षासाठी नियुक्त केलेले शिवसेनेचे सचिन मराठे आणि सौ. वंदना बिरारी तसेच मनसेच्या सविता काळे यांनी राजीनामा देण्यास नकार देत पक्षालाच आव्हान दिले आहे. दरम्यान, तिघाही सदस्यांचे राजीनामे घेण्यात सेना-मनसेला अपयश आल्याने अखेर महापौरांनी अपक्ष व रिपाइंच्या सदस्यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या दोन जागांसाठी दि. १२ मार्च रोजी विशेष सभा बोलविण्यासंबंधी नगरसचिवांना आदेशित केले आहे. स्थायी समितीवर नव्याने आठ सदस्यांची निवड झाल्यानंतर सेना, मनसे, रिपाइं आणि अपक्ष गटाने पक्षपातळीवर ठरविल्यानुसार एक वर्षासाठी निवड केलेल्या सदस्यांचे राजीनामे घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. त्यानुसार शिवसेनेचे सचिन मराठे, वंदना बिरारी आणि सेना-रिपाइं युतीचे सुनील वाघ, मनसेच्या सविता काळे, अपक्ष गटाचे पवन पवार यांचे राजीनामे अपेक्षित होते; परंतु या पाचही सदस्यांनी ‘आपल्या नावाने परस्पर कुणी राजीनामे दिल्यास ते स्वीकारू नये’, असे नगरसचिवांना पत्र दिले होते. दरम्यान, महापौरांनीही एकूणच स्थितीचा अंदाज घेत प्रत्यक्ष सदस्याने स्वत:हून राजीनामा दिल्याशिवाय तो न स्वीकारण्याची भूमिका घेतली होती.
महापालिका स्थायी समितीवर दरवर्षी नवीन सदस्याला संधी
By admin | Updated: March 4, 2015 01:41 IST