शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

एमटीडीसी शोधणार प्रत्येक गावाच्या प्रथा, परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 00:10 IST

प्रत्येक गावाची स्वतंत्र ओळख असते. अशा गावांचा इतिहास, वारसा, प्रथा व परंपरा वेगवेगळ्या असतात, नेमका त्याचाच शोध घेऊन गावपातळीवर पर्यटन वृद्धीसाठी प्रयत्न करण्याचा निर्णय महाराष्टÑ पर्यटन विकास महामंडळाने घेतला असून, त्यासाठी प्रत्येक गावातील प्रमुख नागरिक, इतिहासकार, जाणकारांना बरोबर घेऊन शिवार फेरी काढण्यात येणार आहे. या शिवार फेरीच्या माध्यमातून गावाचा इतिहास जाणून घेण्यात येणार आहे.

नाशिक : प्रत्येक गावाची स्वतंत्र ओळख असते. अशा गावांचा इतिहास, वारसा, प्रथा व परंपरा वेगवेगळ्या असतात, नेमका त्याचाच शोध घेऊन गावपातळीवर पर्यटन वृद्धीसाठी प्रयत्न करण्याचा निर्णय महाराष्टÑ पर्यटन विकास महामंडळाने घेतला असून, त्यासाठी प्रत्येक गावातील प्रमुख नागरिक, इतिहासकार, जाणकारांना बरोबर घेऊन शिवार फेरी काढण्यात येणार आहे. या शिवार फेरीच्या माध्यमातून गावाचा इतिहास जाणून घेण्यात येणार आहे.  देश व राज्याची स्वतंत्र ओळख असून, त्यातील प्रत्येक गावाचा एक वेगळा इतिहास आणि त्यात दडलेला वारसा आपल्याला अनुभवायला मिळतो. या इतिहासाला पर्यटनाची जोड दिल्यास इतिहासाबद्दल आवड, वारसा जतन करण्यासाठी जनजागृती आणि पर्यटनाच्या माध्यमातून ग्रामीण विकास असा तिहेरी उद्देश एकाच उपक्रमातून साध्य करणे शक्य आहे. हा हेतू डोळ्यासमोर ठेवून गावागावातून शिवार फेरी काढून ग्रामीण भागात नेमके काय दडले आहे हे या शिवार फेरीतून नोंदविले व उलगडले जाणार आहे. त्याची सुरुवात नाशिक जिल्ह्यापासून करण्यात आली असून, नाशिकची शक्तीस्थळे ओळखून त्या गावांपर्यंत पर्यटकांना नेण्याचा प्रयत्न महाराष्टÑ पर्यटन महामंडळ करणार असल्याची माहिती एमटीडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक नितीन मुंडावरे यांनी दिली.  शिवार फेरी हा ग्रामीण भागातील पर्यटन संधी शोधणे व प्रत्येक गावात कोणत्या स्वरूपाचा वारसा, प्रथा, परंपरा आहेत हे शोधण्याचे काम करणार आहे. निफाड तालुक्यातील १३४ गावांमधून शिवार फेरी होणार असून, यात नाशिकच्या इतिहासाचे अभ्यासक रमेश पडवळ, नाणे अभ्यासक चेतन राजापूरकर यांच्या मदतीने एमटीडीसी निफाड तालुक्यातील गावागावातील वारसा समोर आणण्याचा प्रयत्न करणार आहे. पहिल्या शिवार फेरीची सुरुवात चेहेडी खुर्द या ऐतिहासिक गावापासून झाली. त्यावेळी शिवार फेरीत गावातील मंदिरे, इतिहास ग्रामस्थांकडून जाणून घेण्यात आला. त्यानंतर गोदाकाठावरून पुरामुळे विस्थापित झालेले वºहेदारणा गावाविषयी जाणून घेण्यात आले. लालपाडी या गावातील मंदिरे, गोदाकाठ, बोहाडा परंपरा या विषयीची माहिती जाणून घेण्यात आली. लालपाडीवरून शिवार फेरी दारणा सांगवी येथे गेली. तेथील प्राचीन मंदिरे, गावातील वाडे, प्रथेची गावकऱ्यांकडून माहिती घेण्यात आली.निफाडच्या इतिहासाचे होणार संकलननिफाड तालुक्यातील प्रत्येक गावाचे वैशिष्ट्य, प्रथा, परंपरा, उत्सव, इतिहास, वेगळेपणाची नोंद करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार असून, यासाठी काम करणाºया अभ्यासकांना एमटीडीसीकडून सहकार्य केले जाणार आहे. शिवार फेरीच्या माध्यमातून संकलित होणारी माहिती पुस्तकरूपात येणार असल्यामुळे निफाडमधील गावांनी आपल्या गावाविषयी तसेच वारसाविषयी नोंदी ८३८००९८१०७ या क्रमांकावर संपर्क साधून  द्यावी, असे आवाहन एमटीडीसीचे व्यवस्थापक नितीन मुंडावरे यांनी केले आहे.

टॅग्स :tourismपर्यटन