शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कृष्णनगरमधील घटना : पत्ता विचारण्याचा बहाणा; संशयित सीसीटीव्ही कॅमेºयात कैद साडेसहा लाखांची रोकड पळविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 00:46 IST

पंचवटी : गॅस गुदामात काम करणाºया व्यवस्थापकाच्या दुचाकीला लाथ मारून डिकीतील साडेसहा लाख रुपयांची रोकड असलेली बॅग दुचाकीवरून आलेल्या संशयितांनी पळवून नेल्याची घटना मंगळवारी (दि.३०)घडली़

ठळक मुद्देदुचाकीचा वेग कमी केला़दुचाकीला लाथ मारली

पंचवटी : येथील तपोवन कॉर्नरवरील एच. जोशी ब्रदर्स गॅस गुदामात काम करणाºया व्यवस्थापकास पत्ता विचारण्याचा बहाणा करून त्याच्या दुचाकीला लाथ मारून खाली पाडल्यानंतर डिकीतील साडेसहा लाख रुपयांची रोकड असलेली बॅग विनानंबरच्या दुचाकीवरून आलेल्या संशयितांनी पळवून नेल्याची घटना मंगळवारी (दि.३०) दुपारच्या सुमारास श्रीकृष्णनगर उद्यानाजवळ घडली़ गणेशवाडी येथील रहिवासी सतीश साळी (६०) हे गॅस वितरक एजन्सीकडे व्यवस्थापक म्हणून काम करतात. मंगळवारी दुपारी सव्वाचार वाजेच्या सुमारास साळी हे वितरकाकडे जमा झालेली सहा लाख ४४ हजार रुपयांची रोकड असलेली बॅग दुचाकीच्या डिकीत ठेवून बँकेत भरण्यासाठी निघाले़ श्रीकृष्णनगर उद्यानाजवळील रस्त्याने जात असताना गतिरोधक असल्याने साळी यांनी दुचाकीचा वेग कमी केला़ यावेळी राखाडी रंगाच्या विनाक्रमांकाच्या दुचाकीवरून आलेल्या संशयितांनी साळी यांना पंचवटी पोलीस ठाण्याचा पत्ता विचारला व साळी यांच्या दुचाकीला लाथ मारली़ साळी हे जमिनीवर पडले असता संशयितांनी दुचाकीची चावी काढून डिकीतील सहा लाख ४४ हजार रुपयांची रोकड असलेली बॅग काढून पळ काढला़ या घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून संशयित आरोपींचे सीसीटीव्ही फुटेज मिळविले असून, दोघेही संशयित हे २२ ते २५ वयोगटातील आहेत़संशयित माहीतगारच?तपोवन कॉर्नर येथील गॅस वितरकाकडे कामाला असलेले साळी हे बँकेत रोकड भरण्यासाठी जात असल्याची माहिती संशयित आरोपींना माहिती असल्याने संशयित हे माहीतगार असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. साळी हे बँकेत कधी जातात याची पाळत ठेवून संशयितांनी लाखोंची रोकड लुटून नेल्याची चर्चा आहे़ हे दोघेही संशयित सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाले असून, त्यांचा पोलीस शोध घेत आहेत़