शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

संध्यासमयी हेळसांड थांबवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 01:28 IST

शिक्षणाचे प्रमाण वाढल्याने व रोजगाराच्या शोधात तरुण वर्ग व्यवसाय, नोकरीनिमित्ताने ग्रामीण भागातून शहराकडे स्थलांतराच्या वाढत्या प्रमाणाबरोबरच विभक्त कुटुंब पद्धती रूढ होत आहे. त्यामुळे काही पाल्यांकडून त्यांच्या आई-वडिलांना वाऱ्यावर सोडल्यामुळे वृद्धाश्रामातील वृद्धांची वाढती संख्या चिंताजनक आहे.

ज्येष्ठ नागरिक दिन विशेषनाशिक : शिक्षणाचे प्रमाण वाढल्याने व रोजगाराच्या शोधात तरुण वर्ग व्यवसाय, नोकरीनिमित्ताने ग्रामीण भागातून शहराकडे स्थलांतराच्या वाढत्या प्रमाणाबरोबरच विभक्त कुटुंब पद्धती रूढ होत आहे. त्यामुळे काही पाल्यांकडून त्यांच्या आई-वडिलांना वाऱ्यावर सोडल्यामुळे वृद्धाश्रामातील वृद्धांची वाढती संख्या चिंताजनक आहे. त्यातच शासनाने लागू केलेल्या विविध योजनांपासून आजही ज्येष्ठ नागरिक वंचित असल्याचे दिसत आहे.सध्या देशात सुमारे १३ कोटी ज्येष्ठ नागरिक आहे. ही संख्या एखाद्या देशाएवढी आहे. देशात ‘वृद्धाश्रम’ योजनेत अनाथ, निराधार ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य शासनाने वृद्धाश्रम ही योजना सुरू केलेली आहे. तसेच ‘मातोश्री वृद्धाश्रम’ योजना ही ज्येष्ठ नागरिकांना वृद्धाश्रमामध्ये सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात. ज्येष्ठांना ओळखपत्र देणे ही एक योजना त्यांच्यासाठी कार्यान्वित आहे. ओळखपत्र दिल्यानंतर त्यांना बस प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत मिळते. शिवाय रेल्वे, बँक इत्यादी ठिकाणीही त्यांना सुविधा मिळतात. मात्र अद्याप अनेक ज्येष्ठ नागरिकांना हे ओळखपत्र मिळालेले नाही. संजय गांधी निराधार योजनेंतर्गत निराधार व आर्थिकदृष्ट्या मागास वृद्ध नागरिकांनाही लाभ देण्यात येतो. त्यांना प्रती महिना ६०० रुपये देण्यात येतात. तसेच श्रावणबाळ योजना, वृद्धापकाळ निवृत्तियोजना या योजनेंतर्गत ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक यांना लाभ देण्यात येतो. यापासून अनेक जण वंचित आहेत.ज्येष्ठ नागरिकांच्या इतर मागण्याबस व इतर सुविधांचा लाभ घेण्यासाठी ओळखपत्राला सध्या ६५ वर्षांची वयोमर्यादा आहे मात्र ती ६० वर्षे करण्यात यावी, ज्येष्ठांना मेडिकल सुविधांचा लाभ मिळावा, तसेच घरात असणारे वाढते गृहकलह थांबवावे त्यासाठी विशेष तरतुदी करावी, वृद्धाश्रमांची संख्या वाढवावी, बॅँक , बस, रेल्वेमध्ये ज्येष्ठांसाठी स्वतंत्र्य सुविधा असाव्यात, तसेच शासनाने बंद केलेले समाजगृहे ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव ठेवण्यात यावे तसेच सद्यस्थितीत असलेले ज्येष्ठ नागरिकांचे सभागृहांना वाढीव भाड्यापासून सुटका करावी. यासारख्या अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या आहेत.ज्येष्ठांना मेडिकल सुविधा उपलब्ध करून द्यावा. सध्या ज्येष्ठ नागरिकांना मिळणाºया सवलती या तोकड्या असून, शासनाने आमच्या बांधवांसाठी विशेष सवलती द्याव्यात तसेच ज्येष्ठ नागरिकाची वयोमर्यादा ही ६५ वर्षांवरून ६०वर करण्यात यावी. यासाठी शासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.- बापूसाहेब कुलकर्णी, अध्यक्ष,निरामय ज्येष्ठ नागरिक संघ, डीजीपीनगरज्येष्ठ नागरिकांसाठी तयार करण्यात आलेल्या योजना व तरतुदींपासून आजही अनेक वृद्ध वंचित आहे. तसेच शासकीय कार्यालयामध्ये ज्येष्ठांना मिळणारी वागणूक ही निंदनीय आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक संघटनांसाठी त्यांच्या भागातच त्यांना हक्काचे सभागृह मिळणे आवश्यक आहे.- मुकुंद भणगे, अध्यक्ष,कृतार्थ ज्येष्ठ नागरिक संघ, इंदिरानगरशासनाने जुलैमध्ये सर्व पालिका, महापालिकांना शहरातील ज्येष्ठांसाठी मोफत आरोग्य शिबिर व औषधे पुरविले पाहिजे, असी तरतूद केली आहे, परंतु एकाही शहरात याची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. तसेच ज्येष्ठ नागरिक संघटनांसाठी विरंगुळा कें द्र उभारले गेले पाहिजे, मात्र पालिका आहे त्या केंद्रांना वाढीव भाडे लावून नागरिकांच्या खिशाला कात्री लावत आहेत.- विजय भावे, अध्यक्ष, शतायुुषी ज्येष्ठ नागरिक संघ, राजीवनगर

टॅग्स :Nashikनाशिक