शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

मजूर गावी गेल्यासही वाढणार अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 23:10 IST

नाशिक : लॉकडाउन आणि संचारबंदीमुळे सध्या नाशिकमध्येच असलेल्या मजुरांनी मूळगावी जाण्याची धडपड सुरू केली आहे. शासकीय पातळीवर तशी परवानगी देण्याची तयारी सुरू आहे, मात्र तसे झाल्यास सर्वच प्रकारची कामे अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नाशिक : लॉकडाउन आणि संचारबंदीमुळे सध्या नाशिकमध्येच असलेल्या मजुरांनी मूळगावी जाण्याची धडपड सुरू केली आहे. शासकीय पातळीवर तशी परवानगी देण्याची तयारी सुरू आहे, मात्र तसे झाल्यास सर्वच प्रकारची कामे अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.कोरोना संसर्ग टाळण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने गेल्या २३ मार्चपासून सर्वत्र लॉकडाउन घोषित केले आहे. ते वाढतच असून आता तिसऱ्या टप्प्याचे लॉकडाउन सध्या सुरू आहे. तथापि, लॉकडाउनमुळे नाशिकमध्ये अनेक मजुरांना इच्छा असून, त्यांच्या मूळ गावी जाता आलेले नाही. कोरोनामुळे घराची चिंता लागून राहिलेल्या नागरिकांनी स्थलांतरित करण्याची मागणी सुरू आहे. लॉकडाउन काळात नाशिकमार्गे निघालेल्या राज्यातील आणि उत्तर भारतातील स्थानिक मजूर आणि स्थलांतरितांना नाशिक जिल्ह्यात निवारा केंद्रात ठेवण्यात आले होते. एकूण २७ केंद्रात १ हजार ९०१ मजूर आणि कामगारांना निवारा केंद्रात ठेवण्यात आले होते. त्यातील भोपाळ येते ३३२ आणि लखनऊ येथील ८४७ कामगारांना विशेष रेल्वेद्वारे पाठविण्यात आले आहे.आता अशाच प्रकारे शेकडो मजूर त्यांच्या मूळ गावी जाण्यास इच्छुक असून, त्यांनी शनिवारी (दि.२) जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी केली होती. घराची ओढ लागलेल्या या मजुरांना आता मूळ ठिकाणी पाठविण्यासाठी शासनही राजी होत आहे. त्यादृष्टीने तयारी सुरू आहे. तथापि, अशाप्रकारचे हजारो मजूर गावी गेल्यास मात्र, अनेक प्रकारचे उद्योग धंद्यावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे.जाणकारांच्या म्हणण्यानुसार बांधकाम क्षेत्रात सुमारे ७० टक्के परप्रांतीय कामगार असून, ते परत गेल्यास अनेक अडचणींना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. जी कामे पूर्णत्वास आली आहेत, तीदेखील लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधी लॉकडाउन आणि संचारबंदी आता मजुरांची टंचाई जाणविण्याची शक्यता आहे.लॉकडाउनसारख्या अडचणींमुळे महारेराने मार्चपर्यंत पूर्ण होणे आवश्यक असलेल्या बांधकामांना तीन महिन्यांची मुदतवाढ दिली. परंतु आताही अत्यावश्यक बांधकामांना विशेषत: अडकलेल्या मजुरांना दिलासा देण्यासाठी परवानगी दिली असली तरी बांधकाम साहित्याची दुकानेच खुली नाही. त्यामुळे बांधकामे पूर्ण होण्याविषयी शंका आहे.- अविनाश शिरोडे, विकासक, नाशिकपरप्रांतीय मजूर स्थलांतरित झाल्यास अनेक अडचणी उद््भवणार आहेत. विशेषत: आता लॉकडाउन शिथिल करून कामांना गती द्यायची असताना आता परप्रांतीय मजूर गेल्यास ते पावसाळ्यात येणार नाहीत त्यामुळे कामे सुरू होऊनदेखील ती रखडणार आहेत.- विलास बिरारी, माजी अध्यक्ष, बिल्डर असोसिएशन आॅफ इंडिया

टॅग्स :Nashikनाशिक