शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

बोहल्यावर चढण्यापूर्वीच ‘त्याने’ मृत्यूला कवटाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 00:25 IST

मुलाच्या अंगाला हळद लागणार असल्याने कुटुंबात एकच उत्साह अन् आनंदाचे वातावरण, तर वधू कुटुंबाकडे विवाहसोहळ्याची जय्यत तयारी सुरू होती. नियतीला मात्र हे मान्य नव्हते. ‘शुक्रवारी हळद आहे, त्यामुळे घराबाहेर पडू नको, असे आईने आपल्या मुलाला बजावलेही; तरीदेखील निखिल गुरुवारी सायंकाळी ‘लगेच येतो...’ असे सांगून घराबाहेर पडला तो कायमचा न येण्यासाठी...

नाशिक : मुलाच्या अंगाला हळद लागणार असल्याने कुटुंबात एकच उत्साह अन् आनंदाचे वातावरण, तर वधू कुटुंबाकडे विवाहसोहळ्याची जय्यत तयारी सुरू होती. नियतीला मात्र हे मान्य नव्हते. ‘शुक्रवारी हळद आहे, त्यामुळे घराबाहेर पडू नको, असे आईने आपल्या मुलाला बजावलेही; तरीदेखील निखिल गुरुवारी सायंकाळी ‘लगेच येतो...’ असे सांगून घराबाहेर पडला तो कायमचा न येण्यासाठी...सातपूर औद्योगिक वसाहतीजवळील बळवंतनगरमधील एका सोसायटीच्या सदनिकेत निखीलने रात्रीच्या सुमारास गळफास घेत मृत्यूला कवटाळल्याने दोन्ही कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला. पंचवटीतील हिरावाडी येथील सेवानिवृत्त शिक्षक दाम्पत्य देशमुख यांचा एकुलता एक मुलगा निखील प्रकाश देशमुख (३०) हा व्यवसाय करत होता.कारखान्यापासून जवळच कुटुंबीयांनी त्यास सदनिका घेऊन दिली होती. त्याचा विवाह शहरातील एका प्रतिष्ठित अशा कुटुंबातील कन्येशी होणार होता. निखील गुरुवारी सायंकाळी ७ वाजता घराबाहेर पडला. रात्री १० वाजेपर्यंत त्याचा भ्रमणध्वनी सुरू होता; मात्र त्यानंतर भ्रमणध्वनी बंद झाल्याचे कुटुंबीयांनी संपर्क साधला असता भ्रमणध्वनी बंद झाल्याचे त्यांच्या लक्षात आले व त्यांनी शोधाशोध सुरू केली असता त्यांना निखीलचा मृत्यू झाल्याचे समजले अन् आनंदोत्सव शोकसागरात बुडाला.शुक्रवारी हळद आटोपून शनिवारी मंगलाष्टके होणार होती. कटुंबीयांनी विवाहाची जय्यत तयारी केली. कुटुंबातील आबालवृद्ध आनंदोत्सव साजर करत होते. नववधू-वरावर अक्षता टाकत त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभाशीर्वाद देण्याचा मुहूर्त येण्याअगोदरच निखीलने आपले आयुष्य संपविल्याने दोन्ही कुटुंबांवर आभाळ फाटले. निखीलच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी, असा परिवार आहे. गंगापूर पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.शोकाकू ल वातावरणात अंत्यसंस्कारऐन हळदीच्या दिवशी शुक्रवारी (दि.१९) निखीलच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात पंचवटी अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वधू-वरपित्याचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते.निखीलच्या मातोश्री व बहिणींच्या अश्रूंचा बांध फुटला होता. निखीलच्या अशा मंगलमयी क्षणाच्या तोंडावर अचानक झालेल्या मृत्यूने देशमुख कुटुंबाला मोठा धक्का बसला. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबीय हादरले असून, त्या दु:खातून ते अद्यापही सावरलेले नाहीत.‘मी आयुष्यात काही करू शकलो नाही...’निखीलने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. तत्पूर्वी त्याने ‘मी आयुष्यात काही करू शकलो नाही म्हणून जीवन संपवित आहे’ असा मजकूर असलेली चिठ्ठी लिहून ठेवल्याचे पोलिसांना आढळले.

टॅग्स :Nashikनाशिक