शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

‘ईव्हीएम’बरोबरच राष्टÑवादीचा गद्दारांवरही राग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 00:45 IST

लोकसभा निवडणुकीत नाशिक जिल्ह्यातील दोन्ही जागा गमाविल्यानंतर राष्टÑवादी कॉँग्रेसच्या मंथन बैठकीत ईव्हीएमबाबत संशय व्यक्त करताना पक्षातील गद्दारांवर तोंडसुख घेण्यात आले.

नाशिक : लोकसभा निवडणुकीत नाशिक जिल्ह्यातील दोन्ही जागा गमाविल्यानंतर राष्टÑवादी कॉँग्रेसच्या मंथन बैठकीत ईव्हीएमबाबत संशय व्यक्त करताना पक्षातील गद्दारांवर तोंडसुख घेण्यात आले. पक्षातील फुटिरांची नावे आपल्याला गोपनीय पाकिटातून द्यावीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा यावेळी पक्षाचे नेते माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांनी यावेळी दिला.लोकसभा निवडणुकीनंतर पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत बैठक घेऊन आढावा घेतला होता. त्यानंतर गुरुवारी (दि.६) नाशिक शहरातील राष्टÑवादी भवनात छगन भुजबळ यांनी पक्षाची संघटनात्मक आढावा बैठक घेतली. या बैठकीत फुटिरांबरोबरच कर्तृत्वशून्य निष्क्रिय पदााधिकाऱ्यांवर अन्य अनेक जणांनी टीका केली आणि असे निष्क्रिय पदाधिकारी बदलण्याची जोरदार मागणी करण्यात आली.देशभरात जे घडले, त्यापेक्षा वेगळे नाशिकमध्ये घडले नाही. त्यामुळे पराभवामुळे खचून जाऊ नये, असे सांगतानाच भुजबळ यांनी विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज राहण्याची सूचना छगन भुजबळ यांनी केली आहे. यावेळी भुजबळ यांनी ईव्हीएमविषयी शंका उपस्थित केली. देशभरात तीनशे मतदार ठिकाणी झालेले मतदान आणि मोजलेले मतदान यात फरक असल्याचे आढळले आहे. या पार्श्वभूमीवर पूर्वीप्रमाणेच मतपत्रिकांवरच मतदान घेतले जावे, अशी मागणी देशपातळीवर जोर धरत आहे. देशात संशयाचे वातावरण असून, सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजात हस्तक्षेप केल जात आहे. त्याचप्रमाणे माध्यमांची मुस्काटदाबी केली जात असल्याचा आरोपही भुजबळ यांनी केला.बैठकीस माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ, आमदार नरहरी झिरवाळ, धनराज महाले, माजी जिल्हाध्यक्ष श्रीराम शेटे, विश्वास ठाकूर, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, अर्जुन टिळे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.कार्यकारिणी बदलणारयावेळी पक्षविरोधी काम करणाºया पदाधिकाऱ्यांवर टीका करण्यात आली अनेकांनी मनोगतामध्ये चांगले आणि कार्यक्षम पदाधिकारी नियुक्त करण्याची मागणी केली. नव्या कार्यकारिणीत ताज्या दमाच्या पदाधिकाºयांना संधी देण्याची मागणी करण्यात आली.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसChagan Bhujbalछगन भुजबळ