शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

जून संपूनही ना ताळमेळ ना नियोजन ! जिपचा अखर्चित निधी जिल्हा नियोजन समितीला परत करण्यासही कालापव्यय

By धनंजय रिसोडकर | Updated: July 1, 2023 14:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क  नाशिक : जिल्हा परिषदेला जिल्हा नियोजन समितीकडून कळवलेल्या नियतव्ययातून जूनपर्यंत नियोजन करायचे असते. तसेच मागील वर्षी ...

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : जिल्हा परिषदेला जिल्हा नियोजन समितीकडून कळवलेल्या नियतव्ययातून जूनपर्यंत नियोजन करायचे असते. तसेच मागील वर्षी खर्च केलेल्या निधीचा ताळमेळ ३० जूनपर्यंत पूर्ण करून अखर्चित निधी जिल्हा नियोजन समितीला परत करायचा असतो. मात्र, यावर्षी अद्याप मागील वर्षी प्राप्त झालेल्या ४५१ कोटी खर्चाचा ताळमेळ लागला नाही. तसेच यावर्षी कळवलेल्या नियतव्ययातून अद्याप नियोजनाला सुरुवातही केली नसल्याचे दिसत आहे.

जिल्हा परिषदेत प्रशासकीय कारकीर्द असताना प्रशासन गतिमान होऊन जिल्हा परिषदेचा निधी त्याच वर्षात खर्च होण्याचा पायंडा पडेल, असे वाटत असताना प्रत्यक्षात प्रशासक काळात प्रशासन धीमे झाल्याची चर्चा आहे. जिल्हा नियोजन समितीने नाशिक जिल्हा परिषदेला २०२२-२३ या आर्थिक वर्षात ४५१ कोटी रुपये नियतव्यय कळवला होता. त्यातून दायित्व वजा करता उर्वरित निधीच्या दीडपट असे ४१३ कोटींच्या निधीचे नियोजन केले. त्याचप्रमाणे २०२१-२२ या वर्षात मंजूर केलेली कामे पूर्ण करण्याची मुदत मार्च २०२३ असताना त्या कामांना ऑक्टोबरपर्यंत स्थगिती देण्यात आली.

यामुळे ही कामे पूर्ण होणार की नाही, असे वाटत असताना, जिल्हा परिषदेने मार्चअखेरीस हा निधी खर्ची पाडण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर जिल्हा नियोजन समितीने जिल्हा परिषदेला नियतव्यय कळवला आहे. मात्र, अद्याप ताळमेळ लागला नसल्याने जिल्हा परिषदेच्या एकाही विभागाने नियतव्ययानुसार दायित्व वजा जाता नियोजनासाठी किती निधी उपलब्ध असणार आहे, याची माहिती घेतली नाही. परिणामी २०२३-२४ या आर्थिक वर्षातील कामांचे नियोजन रखडले आहे. खरे तर जिल्हा परिषदेने ३० जूनच्या आत ताळमेळ करून अखर्चित निधी जिल्हा नियोजन समितीच्या खात्यात वर्ग करायचा असतो. त्यानंतर नवीन वर्षाचे नियोजन करायचे असते. मात्र, यावर्षी यापैकी एकही गोष्ट केलेली नाही.