शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
5
सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
6
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
7
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
8
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
9
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
10
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
11
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
12
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
13
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
14
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
15
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
16
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
17
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
18
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
19
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान

उपाययोजना करूनही अळीचा प्रादुर्भाव वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 01:31 IST

माणिक गणपत बिरारी या शेतकऱ्याच्या तीन एकर क्षेत्रावरील मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला असून, लष्करी अळीच्या बंदोबस्तासाठी अनेक उपाययोजना करूनही दिवसेंदिवस प्रादुर्भाव वाढत आहे.

कंधाणे : येथील माणिक गणपत बिरारी या शेतकऱ्याच्या तीन एकर क्षेत्रावरील मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला असून, लष्करी अळीच्या बंदोबस्तासाठी अनेक उपाययोजना करूनही दिवसेंदिवस प्रादुर्भाव वाढत आहे.अळीने संपूर्ण क्षेत्राचे नुकसान केल्याने या शेतकºयाला हजारो रूपयांचा आर्थिक फटका बसला आहे. कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नुकसानग्रस्त क्षेत्राला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली आहे. परिसरात आधीच वरुणराजाने डोळे वटारले असून, या भागात पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याने बळीराजा चिंतातुर झाला आहे. ज्या शेतकºयांनी विहिरीच्या पाण्यावर मका पिकाची लागवड केली आहे. त्यावरही लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने बळीराजा धास्तावला आहे.माणिक बिरारी या शेतकºयाने आपल्या व मुलाच्या मालकीच्या तीन एकर क्षेत्रावर विहिरीच्या पाण्यावर १ जून रोजी मका पेरणी केली. पेरणी केल्यानंतर वीस ते बावीस दिवसात या क्षेत्रावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आला. या अळीच्या बंदोबस्त करण्यासाठी संपूर्ण क्षेत्रावरील पिकावर अनेक महागड्या कीटनाशकांची फवारणी केली;पण अळीचा प्रार्दुभाव वाढत असून संपूर्ण पीक वाया गेले आहे. आधीच गेल्या वर्षभर दुष्काळाच्या झळा सहन केल्या, मागच्या वर्षीही दुष्काळामुळे मका पीक वाया गेले. यावर्षीहजारो रुपये खर्चून मका पीकजतन केले. मात्र लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने संपूर्ण पीक वाया गेले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती