शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

पर्यावरण संतुलनासाठी जिल्ह्यात टास्क फोर्स स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 01:10 IST

 जिल्ह्यात विकासाची कामे करताना पर्यावरणाचे आणि सांस्कृतिक पाऊलखुणांचे जतन व्हावे यासाठी टास्क फोर्स स्थापन करण्यात आला असून, याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी काढले आहेत.

ठळक मुद्देआदेश निर्गमित : पर्यावरण तसेच क्षेत्रनिहाय सदस्यांचा समावेश

नाशिक :  जिल्ह्यात विकासाची कामे करताना पर्यावरणाचे आणि सांस्कृतिक पाऊलखुणांचे जतन व्हावे यासाठी टास्क फोर्स स्थापन करण्यात आला असून, याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी काढले आहेत.     अनधिकृत उत्खननाबाबत नागरिक व पर्यावरण प्रेमींकडून तक्रारी प्राप्त होत असतात. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पर्यावरण संतुलन व स्थायी विकास साधण्यासाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे जाहीर केले होते.  दोन आठवड्यांपूर्वी या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आल्यानंतर टास्क फोर्सला अंतिम स्वरूप देण्यात आले आहे. या कृती दलामध्ये शासकीय स्तरावर समन्वयक म्हणून अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांची नियुक्ती करण्यात आली असून, कार्यदलाचे सदस्य म्हणून उपवनरक्षक (पूर्व व पश्चिम), जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, सहायक संचालक, नगररचना विभाग, वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, कार्यकारी अभियंता, मेरी, जिल्हा मृदा व जलसंधारण अधिकारी, पुरातत्व विभागाचे प्रतिनिधी, विधी अधिकारी, जिल्हा अधिकारी कार्यालय, जिल्हा माहिती अधिकारी, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग,   आदींचा समावेश करण्यात आला आहे. या टास्क फोर्समध्ये विकासकांचादेखील समावेश करण्यात आला असून, नरडोकेचे भाविक जे. ठक्कर, शंतनू देशपांडे, क्रेडाईचे रवी महाजन, किरण चव्हाण, गौरव ठक्कर  यांचा समावेश असणार आहे. त्याचप्रमाणे खाणपट्टेधारक अभिजित बनकर, सिरील रॉड्रिग्ज, सुदाम धात्रक, बाळासाहेब गांगुर्डे यांचा कृती दलात सदस्य म्हणून समावेश असणार आहे.तर निमंत्रक म्हणून  अश्विनी भट, राम खुर्दुळ, राजेश पंडित, देवचंद महाले, तन्मय टकले, दीपक जाधव  यांचा समावेश कृती दलात असणार आहे.      शासकीय परिपत्रकांन्वये निर्गमित केलेल्या या आदेशानुसार कृती दलात समावेश नसलेल्या परंतु पर्यावरणविषयक कामकाज करणाऱ्या व्यक्तींना त्रैमासिक बैठकीत समन्वयक यांच्या पूर्वपरवानगीने उपस्थित राहण्याची मुभा देण्यात येणार आहे.  गौण खनिजांबाबत वेळोवेळी आढावा घेण्यासाठी कृती दलाची बैठकही आयोजित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पर्यावरणाशी निगडित सूचना, मत, किंवा माहिती द्यावयाची असल्यास tfenvironmentnsk @gmail.com संपर्क साधता येणार असल्याचेही जिल्हाधिकारी  मांढरे यांनी   सांगितले.  टास्क फोर्सच्या धोरणातील प्रमुख मुद्दे...n जिल्ह्यातील गौण खनिजांच्या उत्खननाबाबत धोरण निश्चिती करण्यात येणार असून, त्यामध्ये जिल्ह्यातील डोंगररांगा, गड किल्ले, संरक्षित जंगल, आदी पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील ठिकाणच्या परिसरात अवैध गौण खनिज उत्खनन होऊ नये म्हणून उपायोजना केली जाणार आहे. n कायदेशीर तरतुदीनुसार ज्या ठिकाणी गौण खनिज उत्खनन अनुज्ञेय आहे अशा ठिकाणी उत्खननास मुभा देणे त्याचबरोबर पर्यावरण व विकासकामे यातील समतोल राखण्याच्या दृष्टीने व उत्खननाच्या तक्रारीसंदर्भात सारासार विचार करून निर्णय घेण्यात येणार आहेत.n कृती दलास योग्य वाटतील अशा बाबींवर चर्चा विनिमय करून निर्णय घेण्याची मुभा कार्यदलास असणार असून, जैवविविधतेच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या ठिकाणांची यादी करून अशा स्थळांचे संवर्धन होईल यादृष्टीने प्रयत्न करणे, तसेच ऐतिहासिक स्थळे गड किल्ले, तसेच आदिवासी कला व संस्कृती ठिकाणांचे संवर्धन होण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणार.n पर्यावरणपूरक गोष्टींचा विकासकामांसाठी वापर करण्यास प्रोत्साहन देणे.n वेळोवेळी पर्यावरणविषयक अभ्यासक व्यक्तींना आवश्यकतेनुसार बैठकीस निमंत्रित करण्यात येणार आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयGovernmentसरकार