मालेगाव : येथील महानगरपालिकेत मालमत्ता या विभागाची स्थापना करण्यात आली असून, यामुळे मनपाच्या मालकीच्या मालमत्तांची माहिती मिळण्याच्या कामात सुसूत्रता येणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. येथील महानगरपालिका अस्तित्वात येऊन १४ वर्षे झाली असून, मनपाच्या मालकीच्या मालमत्तासंबंधित माहिती मिळण्यास अनेक अडचणी येत होत्या. येथील प्रशासनाला मनपाच्या मालकीची मालमत्ता सांगणे दुरापास्त होत होते. त्यामुळे आयुक्त किशोर बोर्डे यांनी या विभागाची स्थापना केली. या विभागामार्फत मनपाचे भूखंड, इमारती, व्यापारी संकुले, गाळे, सभागृह आदिंची माहिती गोळा करण्यात येणार आहे. यात मनपाच्या मालकीची परंतु नावावर नसलेली मालमत्ता नावावर करण्यात येणार आहे. येथील मनपात चौदा वर्षांनंतर हा विभाग कार्यान्वित करण्यात आल्याने नागरिकांना आश्चर्य वाटत आहे. या चौदा वर्षांत मनपाच्या व नगरपालिकेच्या मालकीच्या अनेक मालमत्ता व भूखंडांची परस्पर विक्री करण्यात आली आहे. यात अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे पाच ते सात वर्षांपूर्वी एका नगरसेवकाने महासभेत सिद्ध करून चौकशीची मागणीही केली होती. मात्र त्याकडे काणाडोळा करण्यात आलेला आहे. मनपाच्या अ़नेक मोकळ्या भूखंडांची खासगी व्यक्तींनी प्लॉट पाडून विक्री करून वसाहती निर्माण केल्या असल्याचे बोलले जाते. त्यामुळे या विभागाला कितपत यश मिळेल याबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. (प्रतिनिधी)आझादनगरात बालकावर लैंगिक अत्याचारमालेगाव : आझादनगर भागात पाचवर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार करून त्याला चटके देऊन व चाकूने जखमी करणाऱ्या जुनेद नावाच्या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. रविवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास दारूल लह यतिमखान्याजवळ ही घटना घडली. पीडित मुलाच्या आईने (रा. गोवंडी, मुंबई) मंगळवारी (दि.२२) सायंकाळी आझादनगर पोलिसांत फिर्याद दिली. (प्रतिनिधी)
महापालिकेत मालमत्ता विभागाची स्थापना
By admin | Updated: September 23, 2015 23:32 IST