शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये मालवाहू वाहनांसाठी नियंत्रण कक्ष स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 16:31 IST

अन्नधान्य, भाजीपाला, औषधे आदी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीतठेवणे, नागरिकांना वैद्यकीय सेवा सुरळीत ठेवण्याच्या उद्देशाने मालवाहू वाहनांना विना अडथळा वाहतुकीसाठी विशेष परवाना प्रमाणपत्र उपलब्ध करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत प्रतिदिन एक अधिकारी व तीन कर्मचाऱ्यांच्या विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून दिली आहे. 

ठळक मुद्देजीवनावश्यक मालवाहू वाहतूकीचे नियोजन नाशिकमध्ये वाहनांसाठी नियंत्रण कक्ष स्थापन

नाशिक : कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी शासनाने २३ मार्चपासून सर्वप्रकारची वाहतूक मर्यादित अथवा बंद करण्याची घोषणा करीत लॉकडाउनची घोषणा केली आहे. या काळात अन्नधान्य, भाजीपाला, औषधे आदी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीतठेवणे, नागरिकांना वैद्यकीय सेवा सुरळीत ठेवण्याच्या उद्देशाने मालवाहू वाहनांना विना अडथळा वाहतुकीसाठी विशेष परवाना प्रमाणपत्र उपलब्ध करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत प्रतिदिन एक अधिकारी व तीन कर्मचाऱ्यांच्या विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून दिली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून शासनामार्फत कठोर उपाययोजना हाती घेण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार परिवहन आयुक्तांनी अन्नधान्य, भाजीपाला, औषधे आदी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीतठेवणे, नागरिकांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करणे, सर्व खासगी वाहने यांची अद्ययावत माहिती तयार करणे, तसेच कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवांचा पुरवठा पुरेशा प्रमाणात होण्यासाठी वापरण्यात येणाºया सर्व मालवाहू वाहनांना विना अडथळा वाहतूक करता यावी म्हणून विशेष परवाना प्रमाणपत्र जारी करण्याचे निर्देश केलेले आहेत. अशा जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रमाणपत्र संबंधित प्रादेशिक/उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथून देण्याबाबतचे निर्देश दिले आहेत. असे प्रमाणपत्र शासनाच्या अधिसूचनेनुसार प्रतिबंधातून वगळण्यात आलेल्या बाबींची वाहतूक करणाऱ्यां मालवाहू वाहनांना देणेबाबत आदेशित करण्यात आले असून, शासनाच्या २३ मार्चच्या आदेशांची अंमलबजावणी करण्यासाठी नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयातील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनयकुमार अहिरे नाशिक यांच्या नियंत्रणाखाली, नियंत्रण कक्षाची स्थापना व मालवाहू वाहनांना प्रमाणपत्र जारी करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत प्रतिदिन एक अधिकारी व तीन कर्मचाºयांच्या विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून दिली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिकTrafficवाहतूक कोंडीRto officeआरटीओ ऑफीस