शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही कोणाच्याही दारात भीक मागायला आलो नाहीत; लंडनमधील कार्यक्रमादरम्यान भाजप खासदाराचा इशारा
2
Howard Lutnick : "मी भारताचा खूप मोठा फॅन"; भारत-अमेरिका व्यापार कराराबद्दल हॉवर्ड लॅटनिक यांनी दिली गुड न्यूज
3
एकाच दिवशी बुध-मंगळाचे गोचर: ८ राशींचे कल्याण, सुखाची भरभराट; समृद्धी वृद्धी, मंगलमय काळ!
4
Stock Market Today: ११९ अंकांच्या तेजीनंतप ४०० अंकांनी घसरला Sensex, बँक निफ्टीमध्येही विक्रीचा सपाटा
5
Corona Virus : कोरोनामुळे भीषण परिस्थिती?; जपानी बाबा वेंगा यांची 'भयावह' भविष्यवाणी, सांगितली 'ती' वेळ
6
भारताची राष्ट्रभाषा कोणती? जगासमोर कनिमोळींनी दिलेल्या उत्तराने देशाची मान उंचावली
7
IPL 2025: कोण संपवणार विजेतेपदाचा १८ वर्षांचा दुष्काळ? आज अंतिम लढतीचा रंगणार थरार
8
कमालीची आहे ही स्कीम, महिन्याला ₹४५०० गुंतवा; ६० व्या वर्षी मिळतील ₹१.५६ कोटी, ₹५१,८४८ चं मंथली पेन्शन
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी; राहुल गांधीचा जामीन रद्द करण्याची याचिका फेटाळली
10
कधीही निराश झालो नाही, ब्रेक घेत कसून अभ्यास केला... ‘जेईई’च्या दोन टॉपरचे ‘गुपित’
11
हाहाकार! मणिपूरमध्ये पावसाचं थैमान; १९,८०० लोकांना पुराचा फटका, ३,३६५ घरांचं नुकसान
12
एकीकडे लष्करी छावणीवर कोसळला डोंगर, दुसरीकडे चिखलातून वाट तुडवत जवानांचे मदतकार्य
13
IPL 2025: नवा किंग कोण ठरणार? बेंगळुरू आणि पंजाब यांच्यात आज रंगणार 'महामुकाबला'
14
आजचे राशीभविष्य : ०३ जून २०२५; हट्टीपणा सोडून द्या, कोणत्याही कामासंबंधी आत्मविश्वासाने त्वरित निर्णय घ्याल
15
अकरावी प्रवेशाचा गोंधळ अजून सुरूच; ५ जूनपर्यंत मुदतवाढ! फ्रेशरचीही रिपीटर म्हणून नोंद
16
सातव्या आयोगातील त्रुटी दूर, पण थकबाकी नाही; सुधारित वेतनश्रेणी १ जूनपासून लागू
17
पडघा, बोरीवलीत ATSचे छापे; १२ ताब्यात; पहाटे २ ते दुपारी ४ पर्यंत सुरु होते कोम्बिंग ऑपरेशन
18
१६ तास जनावरांसारखं 'काम' अन् ३००-४०० रुपये 'दाम'; दिवसभरात एक जोडपे तोडते तब्बल २ टन ऊस
19
सिक्कीममध्ये भूस्खलनात ३ जवानांचा मृत्यू, ६ बेपत्ता; लाचेनमध्ये १०० हून अधिक लोक अडकलेले
20
जास्त गर्दीच्या मेट्रो स्थानकांचा आपत्कालीन प्लॅन तयार करा; आशिष शेलारांचे MMRDAला निर्देश

‘संदर्भ’तील उपकरणे आजारी

By admin | Updated: May 3, 2016 00:02 IST

नादुरुस्तीचा रोग : सिटीस्कॅनची यंत्रणा बंद स्थितीत

नाशिक : शासनाच्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील अनेक उपकरणे नादुरुस्त असून, त्यांच्या आजारपणाकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. सिटीस्कॅन यंत्रणा सात-आठ वर्षांपासून बंद स्थितीत असल्याने बाहेरून खासगी संस्थेमार्फत तपासणी करून घेतली जात आहे. दरम्यान, रुग्ण कल्याण समिती अंतर्गत नियामक समितीची सभा होऊन त्यात उपकरणांच्या दुरुस्तीसंदर्भात चर्चा करण्यात आली. विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू करण्यात आली असल्याने रुग्णांना उपचाराच्या सर्व सुविधा मोफत देण्याचे आदेश शासनाचे आहेत. त्यामुळे रुग्णालयात शासनाने सिटीस्कॅन यंत्रणा उपलब्ध करून दिली होती; परंतु सिटीस्कॅन यंत्रावर मोठ्या प्रमाणावर ताण येऊन त्याची ट्यूब निकामी झालेली आहे. सदर ट्यूब बदलण्यासाठी एका एजन्सीने सुमारे ५३ लाख रुपयांचा खर्च सांगितला आहे. परंतु ट्यूब दुरुस्तीचा खर्च हा यंत्राच्या मूळ किमतीपेक्षा २५ टक्के जास्त आहे. याबाबत रुग्णालयाने शासनाकडे पत्रव्यवहार करूनही अद्याप अनुदान प्राप्त झालेले नाही. त्यामुळे जिल्हा रुग्णालयापाठोपाठ संदर्भ रुग्णालयातीलही सिटीस्कॅन यंत्रणा बंद स्थितीत पडून आहे. संदर्भ रुग्णालयात येणारा रुग्ण परत जाऊ नये यासाठी रुग्णालयाने बाहेरील खासगी संस्थांकडून दरपत्रक मागवून त्यांच्याकडून तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय रुग्णालयातील अनेक उपकरणे नादुरुस्त स्थितीत आहेत. त्यात युरो आय.सी. यू. मधील सिरींज पंप बंद आहे. रुग्णालयातील ई.पी.बी. एक्स सिस्टीमही खराब झालेली आहे. सेंट्रल आॅक्सिजन बॅँक नादुरुस्त आहे. कार्डियाक आय.सी.यू.मधील मल्टीपॅरा मॉनिटरच्या अ‍ॅक्सेसरीज नव्याने बदलाव्या लागणार आहेत. आर.ओ. प्लांट ५०० लिटरच्या स्पेअरपार्ट दुरुस्तीची गरज आहे, आदि उपकरणांच्याही दुरुस्तीसंदर्भात नियामक समितीच्या सभेत चर्चा करण्यात येऊन निर्णय घेण्यात आले. याशिवाय सभेत कब्रस्थानलगतची भिंत बांधण्याची कार्यवाही पोलीस बंदोबस्तात करण्याचाही निर्णय घेण्यात आला. विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला आमदार देवयानी फरांदे, आरोग्य उपसंचालक डॉ. सुनील पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक सुरेश जगदाळे, डॉ. प्रसाद भंडारी, अधीक्षक अभियंता एन. एम. खेडकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी, डॉ. व्ही. बी. नामपल्ली आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)