शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

समीकरणे बदलणार : श्रमजीवी संघटना उतरणार रणांगणात त्र्यंबकला वाढला निवडणुकीचा फीव्हर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 00:12 IST

पालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांनी चांगलीच कंबर कसली असून, शहरात निवडणुकीचा फीव्हर चांगलाच वाढू लागला आहे.

ठळक मुद्देनगराध्यक्षपदाची निवडणूक थेट जनतेमधून१७ प्रतिनिधी निवडून द्यायचे आहेत बहुतेक इच्छुकांनी भाजपाकडे उमेदवारी

त्र्यंबकेश्वर : पालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांनी चांगलीच कंबर कसली असून, शहरात निवडणुकीचा फीव्हर चांगलाच वाढू लागला आहे. सध्या पालिकेवर भाजपाचे वर्चस्व असून, आगामी काळात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. श्रमजीवी संघटना पहिल्यांदाच रणांगणात उतरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.त्र्यंबक निवडणुकीसाठी आचारसंहिता तीन दिवसांपूर्वीच लागली आहे. पुढील महिन्यात १० डिसेंबरला मतदान होत आहे. विशेष म्हणजे यावेळच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदाची निवडणूक थेट जनतेमधून केली जाणार आहे. याचवेळी प्रभागांचे आरक्षण चक्रांकित पद्धतीने करण्यात आले आहे. त्यामुळे आपला मोहल्ला सोडून उमेदवारी करणाºयांची नावे दुसºयाच प्रभागात आरक्षण सोडतपद्धतीने पडली आहेत. त्र्यंबक नगर परिषदेसाठी एकूण १७ प्रतिनिधी निवडून द्यायचे आहेत. या पंचवार्षिकपासून नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून जाणार आहे. नगराध्यक्षांबरोबरच या वर्षापासून ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीचे सरपंचपददेखील जनतेतूनच निवडून दिले आहेत. वास्तविक थेट नगराध्यक्षपदाची निवड थेट जनतेतून होण्याची ही तिसरी वेळ आहे. पहिल्यांदा हा मान अण्णासाहेब लोणारी यांना मिळाला होता. त्यानंतर सन २००२ मध्ये थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत महिला नगराध्यक्ष पुष्पा मोहन झोले यांना संधी मिळाली होती. आता यावेळेस तिसºयांदा थेट जनतेतून नगराध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. त्यामुळे या पदासाठी चुरस वाढणार आहे. त्यासाठी तुल्यबळ उमेदवारांची नावे निश्चित झाली आहेत. या पदासाठी बहुतेक इच्छुकांनी भाजपाकडे उमेदवारी मागितली आहे. सुनील अडसरे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत मागील महिन्यात काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यात कैलास घुले, सुनील अडसरे, पुरुषोत्तम लोहगावकर, अ‍ॅड. पराग दीक्षित व सुचेता शिखरे या प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे. पुरुषोत्तम लोहगावकर व अ‍ॅड. पराग दीक्षित वगळता कैलास घुले, सुनील अडसरे व सुचिता शिखरे यांनी यापूर्वी नगराध्यक्षपद भूषविलेले आहे. याशिवाय शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचेदेखील उमेदवार इतर उमेदवारांसमोर आव्हान उभे करू शकतात. त्यामुळे पालिका निवडणुकीत कोणाच्या हाती निरंकुश पाच वर्षे सूत्रे राहणार हा औत्सुक्याचा विषय ठरणार आहे. उमेदवारी मिळविण्यासाठी अनेकांची धावपळ, मुंबई वाºया, तर कोणी जसे जमेल तसे वरून दबावतंत्राचा वापर करून पक्षाकडून उमेदवारी मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत.