शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

समान कामास समान वेतन ; लिपिक संघटनेचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 00:47 IST

महाराष्ट्र राज्य शासकीय व निमशासकीय विभागात कार्यरत गट ‘क’ तथा लिपिक संवर्गातील नाशिक जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी ग्रेड वेतनात सुधारणा करून समान कामास समान वेतन व समान पदोन्नतीचे टप्पे करणे आणि मंत्रालय ते ग्रामपंचायत लिपिकांचे एकसारखे पदनाम करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी (दि.२२) शहरातून मोर्चा काढून जिल्हाधिकाºयांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.

नाशिक : महाराष्ट्र राज्य शासकीय व निमशासकीय विभागात कार्यरत गट ‘क’ तथा लिपिक संवर्गातील नाशिक जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी ग्रेड वेतनात सुधारणा करून समान कामास समान वेतन व समान पदोन्नतीचे टप्पे करणे आणि मंत्रालय ते ग्रामपंचायत लिपिकांचे एकसारखे पदनाम करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी (दि.२२) शहरातून मोर्चा काढून जिल्हाधिकाºयांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.  नाशिक जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील शासकीय व निमशासकीय कर्मचाºयांनी मंगळवारी गोल्फ क्लब मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून जिल्हाधिकाºयांना कर्मचाºयांच्या मागण्यांचे निवेदन दिले.  यावेळी परिषदेचे जिल्हाध्यक्ष नीलेश देशमुख, समन्वयक विनायक केदारे, कार्याध्यक्ष विश्वास कचरे, रमेश जेजूरकर, नीलेशपाटील, हिरामण झोटिंग, आनंद कांगणे, रंजना मांडे, नीता पाटील आदी उपस्थित होते.लिपिक संवर्गातील कर्मचाºयांनी ग्रेड वेतनात सुधारणा करून समान कामास समान वेतन व समान पदोन्नतीचे टप्पे करणे व मंत्रालय ते ग्रामपंचायत लिपिकांचे एकसारखे पदनाम करण्याच्या मागणीसह डीसीपीएस/ एनपीएस योजना बंद करून मूळची १९८२ ची जुनी सेवानिवृत्ती योजना लागू करण्याची व सातव्या वेतन आयोगाचा वर्षाचा फरक रोखीने देण्यात यावा, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. त्यासोबतच बक्षी समितीच्या शिफारशीनुसार केंद्रीय कर्मचाºयांप्रमाणे लिपिकांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ १०, २० व ३० अशा टप्प्यात देण्यात यावा, सुधारित आकृतिबंध लागू करताना लिपिक संवर्गाची पदे बाह्य यंत्रणेमार्फत अथवा कंत्राटी पद्धतीने निर्मिती न करता ती स्थायी स्वरूपाची करण्यात यावी.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयNashikनाशिक