शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणपूरक आकाशकंदिलांची क्रेझ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 00:27 IST

दीपावलीच्या पार्श्वभूमीवर नेत्रदीपक आकाशकंदील खरेदीसाठी बालगोपाळांसह आबालवृद्धांची शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये गर्दी करत असल्याचे दिसत आहे. यंदा मान्सूनही चांगला झाला असल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विक्र ेत्यांकडून विविध आकाशकंदील विक्रीसाठी ठेवले आहे.

ठळक मुद्देबाजारपेठेत दुकाने सजली : चांदणी, पेशवाई, दिवा आदी प्रकारांचे आकर्षण

नाशिक : दीपावलीच्या पार्श्वभूमीवर नेत्रदीपक आकाशकंदील खरेदीसाठी बालगोपाळांसह आबालवृद्धांची शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये गर्दी करत असल्याचे दिसत आहे. यंदा मान्सूनही चांगला झाला असल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विक्र ेत्यांकडून विविध आकाशकंदील विक्रीसाठी ठेवले आहे. बाजारपेठेत फेरफटका मारल्यास चिनी मालाचे प्रमाण भारतीय वस्तुंनी मोडून काढल्याचे दिसत आहे.दिवाळीचे मुख्य आकर्षण असणारे आकाशकंदिलाचे अनेक प्रकार बाजारात दाखल झाले आहेत. यंदा चिनी आकाशकंदील बाजारात कमी प्रमाणात दिसत असून, पर्यावरणस्नेही विशेषत: ‘हॅण्डमेड पेपर’ तसेच कापडी आकाशकंदीलला विशेष मागणी आहे. त्यात घुमट, चौकोनी, गोलाकार, दिवा, चांदणी, पेशवाई, टमटा बॉल, पॅराशुट आकाशकंदील यंदा बाजारात मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. सणांचा राजा असलेल्या दिवाळीच्या तयारासाठी साऱ्यांची लगबग सुरू झाली असून विविध वस्तू खरेदीसाठी बाजारात ग्राहकांची गर्दी होऊ लागली आहे. यानिमित्ताने बाजारात चैतन्य निर्माण झाले आहे. प्रकाशाचा उत्सव असलेल्या या सणानिमित्त आकाशकंदील, पणत्यांची दुकाने जागोजागी थाटली आहे. आकर्षक आकाशकंदील ग्राहकांचे लक्ष वेधून घेत असून, यावर्षी आकाशकंदिलांचे पारंपरिक आणि काही नवे प्रकारही बाजारात दाखल झाले आहेत. यंदा चायना बनावटीपेक्षा देशी बनावटीच्या आकाशदिव्यांना जास्त पसंती मिळत असल्याचे विक्रे त्यांनी सांगितले. त्यामुळे भारतीय बनावटीच्या आकाशकंदिलांना चांगली मागणी असून, १५ ते ५ हजारांपर्यंत कंदिलांचे दर आहेत.भारतीय आकाशकंदिलांची आजही उपेक्षाकाही वर्षांपासून देशात चायनीज वस्तूंनी भारतीय बाजारपेठेत त्यांचे अस्तित्व निर्माण केले मात्र यामुळे देशातील पारंपरिक आकाशकंदिल बनविणाऱ्यांची संख्येत घट होत गेली. भारतीय बनावटीच्या कंदिलांपेक्षा चायनीज कंदिले, लाइटमाळी स्वस्त मिळत असल्याने परिणामी याचा फटका भारतीय कंदिलांना बसला मात्र पुन्हा पारंपरिक कंदिलांच्या उत्पादनाच्या निर्मितीत वाढ होत असून, यामुळे येणाºया काळात नक्कीच चायनीज वस्तूंना मागे टाकतील, असे मत व्यापारीवर्गातून येत आहे.

टॅग्स :NashikनाशिकDiwaliदिवाळी