नाशिक : बालवयापासूनच पर्यावरण संवर्धन आणि वृक्षारोपणाविषयी जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने पंचवटी परिसरातील जेम्स इंग्लिश मीडिअम स्कूलच्या पूर्व-प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी भविष्यासाठी पर्यावरण संवर्धन उपक्रम राबविण्यात आला.या कार्यक्रमांतर्गत शाळेच्या मुख्यापक नंदिता गांगुली आणि शालेय समन्वयक पोली सेन यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुलमोहर आणि आपट्याची रोपे वाटण्यात आली. पर्यावरण संवर्धन आणि वृक्षारोपणाचे महत्त्व यावेळी विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. विद्यार्थ्यां वाटलेली रोपे त्यांनी लाऊन वाढवावीत पर्वरण संवर्धन करावे हा संदेश या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना देण्यात आला. पूर्व-प्राथमिक विभागाचे शिक्षकवृंद या कार्यक्रमात उपस्थित होते. (वाणिज्य प्रतिनिधी)
जेम्स स्कूलमध्ये पर्यावरण जागर
By admin | Updated: July 15, 2014 00:48 IST