शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
3
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
4
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
5
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
6
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
7
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
8
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
9
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
10
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
11
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
12
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
13
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
14
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
15
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
16
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
17
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
18
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
19
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
20
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
Daily Top 2Weekly Top 5

महिला मजुरांची चक्क कारमधून एन्ट्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2021 21:56 IST

चांदोरी : काळाचा महिमा काही औरच असतो. कामावर जाणाऱ्या महिला मजुरांना रस्त्याने कार दिसली की, आपल्याला यामध्ये कधी बसायला मिळेल याबाबत ते नेहमी स्वप्न पाहत असतात, मात्र एसटी संपामुळे का होईना पण कारमधून जाण्याचे स्वप्न अखेर काही दिवसांकरिता पूर्ण होत असून, शेती काम करण्यास जाताना व येताना वाहनाची कोणतीही सोय नसल्याने अखेर मालकाच्या कारमधून जाण्याचे भाग्य या शेतमजुरांना लाभत आहे.

ठळक मुद्देदिवसभर राबणाऱ्या मजुरांचे एसटी संपामुळे बदलले नशीब

चांदोरी : काळाचा महिमा काही औरच असतो. कामावर जाणाऱ्या महिला मजुरांना रस्त्याने कार दिसली की, आपल्याला यामध्ये कधी बसायला मिळेल याबाबत ते नेहमी स्वप्न पाहत असतात, मात्र एसटी संपामुळे का होईना पण कारमधून जाण्याचे स्वप्न अखेर काही दिवसांकरिता पूर्ण होत असून, शेती काम करण्यास जाताना व येताना वाहनाची कोणतीही सोय नसल्याने अखेर मालकाच्या कारमधून जाण्याचे भाग्य या शेतमजुरांना लाभत आहे.मारुती कारमधून शेतमालक कांदे लावण्यासाठी, सोयाबीन सोंगणी आदी कामासाठी मजूर शेतात नेतो व संध्याकाळी आणून सोडत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्यामुळे दिवसभर शेतात राबराब राबणाऱ्या मजुरांच्या नशिबी ही आता कारचा प्रवास आला आहे.शेतीची काम करायला मजूर मिळत नाही, मिळालेच तर त्यांच्या सर्व अटी व शर्ती शेतमालकाला कबूल कराव्या लागतात. शेतात दिवसभर कांदे लावण्यासाठी त्यांना वाफ्यात रोप खांडून द्यावे लागते, तर सोयाबीन फक्त सोंगून देणार गंज शेतकऱ्याला करावा लागतो, त्यांना जाताना चुलीसाठी लाकडे द्यावी लागतात.आणखी शेतापर्यंत जाण्यायेण्यासाठी वाहनाची व्यवस्था शेत मालकालाच करावी लागते. मजुरी ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशी शेती व्यवसायात विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वच बाजूने मेटाकुटीस आलेला शेतकरी अशाही परिस्थितीत सर्वांच्याच मर्जीने वागतो आहे. ही शेतकऱ्यांसाठी चिंतेची आणि चिंतनाची बाब आहे.शेतमालाचा भाव कमी तर उत्पादन खर्च वाढत असल्याने, शेतकऱ्यांचा शेती व्यवसाय सातत्याने तोट्यात आहे. यंदा अवकाळी व परतीच्या पावसाने सोयाबीन व द्राक्ष पिकाचे नुकसान झाले आहे. आता अनेकांनी सोयाबीन काढून गहू, हरभरा पिकासाठी मशागत व पेरणी सुरू केली आहे.शेतीचा व्यवसाय मजुरांमुळे परावलंबी होत चालला आहे. मजूरही शेतमालकांच्या अडचणीचा फायदा घेऊन अटी-शर्ती घालून कामाला येत आहे. शेतमालकाला नाईलाजाने मजुरांच्या सर्व अटी मान्य कराव्या लागत आहे. शेतात जाण्या-येण्यासाठी वाहनाची व्यवस्था केली तरच मजूर कामाला येते. त्याचबरोबर सर्व शेतीचे वाही पेरणीचे सामान मालकाने शेतात न्यायचे, रोजंदारी मजूर किंवा महिला मजूर फक्त वेळेवर कामाला लागणे व काम संपल्यावर घरी येणे एवढेच काम करते. राहिलेली सर्व कामे नंतर शेतमालकास पूर्ण करावी लागतात. अशी विचित्र अवस्था निर्माण झाली आहे.कांदे लागवड, द्राक्ष बागेतील कामे व इतरही कामाला मजुरांना वाहनातून न्यावे लागते. मजूर पायदळ यायला तयार नाही. अनेक शेतकरी भाड्याच्या वाहनातून तर काही शेतकरी स्वतःच्या कारने मजुरांना शेतात ने-आण करत आहेत. निंदणी, खुरपणी, खत देणे हे सर्व मजूर करतात,शेतीच्या या सर्व कामाचा खर्च काढला तर शेतकऱ्याच्या हाती फार काही उरत नाही. मात्र शेतकऱ्यांपेक्षा मजूर खाऊन-पिऊन सुखी आहे.- प्रणव शंखपाळ, शेतकरी, कारसुळ.

टॅग्स :talukaतालुकाagricultureशेती