शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या मुख्य रस्त्यावरच हातगाड्यांचे अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 13:31 IST

सिडकोतील पवननगर, त्रिमूर्ती चौक, उत्तमनगर, शिवाजी चौक, उपेंद्रनगर, अंबड परिसर यांसह संपूर्ण सिडको भागातील मुख्य रस्ते तसेच बाजारपेठ असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण

ठळक मुद्दे सिडकोतील पवननगर, त्रिमूर्ती चौक, उत्तमनगर, शिवाजी चौक, उपेंद्रनगर, अंबड परिसर यांसह संपूर्ण सिडको भागातील मुख्य रस्ते तसेच बाजारपेठ असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणकेवळ मनपा अधिकारी चिरिमिरी घेत असल्याने अतिक्रमणात वाढ होत असल्याचा आरोप

नाशिक : येथील गोविंदनगर जॉगिंग ट्रॅक ते सिटी सेंटर मॉलकडे जाणाºया मुख्य रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून हातगाडी व्यावसायिकांचे अतिक्रमण वाढले असल्याने वाहनधारकांना त्रास होत असून, यामुळे अपघातही होत आहेत. याबाबत महापालिकेकडून दुर्लक्ष केले जात असून, कारवाई केली जात नसल्याने अतिक्रमणात वाढ होत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.सिडको भागातील मुख्य रस्त्यावर असलेल्या अतिक्रमणामुळे रस्त्याने चालणे मुश्कील होत असतानाच आता गोविंदनगर जॉगिंग ट्रॅक ते सिटी सेंटर मॉलकडे जाणाºया मुख्य रस्त्यावरदेखील अतिक्रमण झाल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. या अतिक्रमणात महापालिकाच जबाबदार असल्याचे सर्वसामान्य नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. सिडकोतील पवननगर, त्रिमूर्ती चौक, उत्तमनगर, शिवाजी चौक, उपेंद्रनगर, अंबड परिसर यांसह संपूर्ण सिडको भागातील मुख्य रस्ते तसेच बाजारपेठ असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. फळविक्रेते, भाजीपाला व्यावसायिक यांबरोबरच विविध व्यवसाय करणाºयांची संख्या वाढतच चालल्याने रस्त्याने वाहन चालविणे मुश्कील होत असून, यामुळे अपघातही होत आहे.गोविंदनगर जॉगिंग ट्रॅक ते सिटी सेंटर मॉलकडे जाणारा मुख्य रस्ता हा चांगला करण्यात आला असून, सुशोभिकरणही करण्यात आले आहे. परंतु केवळ मनपा अधिकारी चिरिमिरी घेत असल्याने अतिक्रमणात वाढ होत असल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे. याच रस्त्याच्या साइटपट्ट्यांवरदेखील मोठ्या प्रमाणात झाडांचा पालापाचोळा साचलेला असून, अस्वच्छता असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcidcoसिडको