शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

गंगापूर धरण क्षेत्रात प्रवेश बंदी : पोलिसांकडून धडक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 14:32 IST

धरणाची सुरक्षितता लक्षात घेता या संपुर्ण भागात जलसंपदा विभाग आणि पोलीसांव्यतिरिक्त अन्य कु णालाही प्रवेश नाकारण्यात आला आहे. हा संपुर्ण परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे. यामुळे या भागात युवकांनी येऊ नये, अशा स्पष्ट सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.

ठळक मुद्देसेल्फी टिपण्यासाठी गंगापूर धरणाच्या परिसरात तरुणाईने येऊ नयेधिंगाण्याला बसणार चाप; दुर्घटनांना आळा घालण्यासाठी मोहीम धरणाची सुरक्षा व पर्यायाने नागरिकांचीही सुरक्षा महत्त्वाची

नाशिक :गंगापूर धरण परिसराची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. सावरगाव बॅकवॉटरला होणारी पर्यटकांसह मद्यपींच्या टोळक्यांची गर्दी, घडणाऱ्या दुर्घटना आणि हुल्लडबाजी रोखण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी गस्त वाढविली आहे. तसेच ठिकठिकाणी पोलीस व पाटबंधारे विभागाच्या वतीने सूचना फलक लावण्यात आले असून प्रतिबंधित क्षेत्र म्हणून धरण परिसर घोषित करण्यात आला आहे.

गंगापूरचा जलसाठा ९१ टक्क्यांवर पोहचला असून छायाचित्र, सेल्फी टिपण्यासाठी गंगापूर धरणाच्या परिसरात तरुणाईने येऊ नये, असे आदेश पाटबंधारे खाते व पोलिस प्रशासनाने दिले आहे.गंगापूर धरणाचा बॅकवाटरचा सावरगाव शिवारातील परिसरासह मुख्य प्रवेशद्वार आणि गिरणारे भागातील बॅकवॉटर अशा संपुर्ण धरण परिसरात तरुण-तरुणींचा नेहमीच राबता असतो. धरणाची सुरक्षितता लक्षात घेता या संपुर्ण भागात जलसंपदा विभाग आणि पोलीसांव्यतिरिक्त अन्य कु णालाही प्रवेश नाकारण्यात आला आहे. हा संपुर्ण परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे. यामुळे या भागात युवकांनी येऊ नये, अशा स्पष्ट सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.

गंगापूर धरणाच्या परिसरात फिरताना आढळणा-या युवकांच्या समुहावर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. गंगापूर धरण पाटबंधारे विभागासह पोलीस प्रशासन धरणाच्या सुरक्षिततेसाठी सतर्क झाले आहे. धरण परिसरात वारंवार युवक बुडण्याच्या घडणा-या दुर्घटनांनाही आळा घालण्यासाठी संयुक्तरित्या कारवाईची मोहीम सुरू केली आहे. पर्यटकांबरोबरच धरणाची सुरक्षा महत्त्वाची असल्यामुळे कारवाईची मोहिम हाती घेण्यात आली आहे. फिरते गस्त पथक कार्यान्वत असल्यामुळे धरण परिसरात आढळून येणा-या पर्यटक, मद्यपींवर कडक कारवाई केली जात असल्याची माहिती शाखा अभियंता सुभाष मिसाळ यांनी दिली.

धिंगाण्याला बसणार चापगंगापूर धरणाचा परिसर हा अत्यंत संवेदनशील आहे. संपुर्ण शहराला पाणीपुरवठा या धरणातून होतो. त्यामुळे धरणाची सुरक्षा व पर्यायाने नागरिकांचीही सुरक्षा महत्त्वाची आहे. पर्यटनाच्या नावाखाली धरण क्षेत्रात हुल्लडबाजी, मद्यप्राशनाला अलिकडच्या काळात वाव मिळाला होता; मात्र पोलिसांनी व पाटबंधारे विभागाने हा उपद्रव थांबविण्यासाठी पावले उचलली आहे. त्यामुळे बेभान पर्यटकांच्या धिंगाण्याला आता चाप बसणार आहे.

टॅग्स :gangapur damगंगापूर धरणNashikनाशिकPoliceपोलिस