घोटी : स्वच्छ भारत अभियान ही काळाची मोठी गरज असून, महिलांनी ठरवल्यास देशात स्वच्छ भारत होण्यास वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन गुरु माँ यांनी केले. त्या घोटी खुर्द येथील बालाजी भगवान यांच्या स्थापना दिवस कार्यक्र मात बोलत होत्या. तालुक्यातील घोटी खुर्द येथे बालाजी भगवान यांच्या कल्याणोत्सव स्थापना दिवस सरपंच सुनीता कोकणे व सदस्य आत्माराम फोकणे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध उपक्र मांनी साजरा करण्यात आला. यानिमित्ताने विविध उपक्र म राबविले. घोटी खुर्द गावात जनजागृती करून स्वच्छ भारत अभियान राबविण्यासाठी मदत करणार असल्याची ग्वाही आत्माराम फोकणे यांनी यावेळी दिली. या कार्यक्र मात गुरु माँ व छोटीमाँ यांनी बेटी बचाव बेटी पढाव या विषयी मार्गदर्शन करत महिलांनी आरोग्यसंदर्भात, मासिक धर्मामध्ये घ्यावयाची काळजी तसेच नशामुक्ती शिबिर, गोशाळा, गोमाता रक्षण आदी समाजातील विविध प्रश्नावर सखोल माहिती देत मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे गुरु माँ आनंद आश्रमच्या वतीने गावातील सर्व महिलांना सॅनिटरी नॅपकिन मोफत देण्याची व्यवस्था केली.
भगवान बालाजी कल्याणोत्सव उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 19:05 IST