नाशिक : सद्यस्थितीत ज्याला ज्ञान मानले जाते, ते ज्ञान नव्हे. तर आत्मज्ञान हेच खरे ज्ञान असून, ते प्राप्त करण्याइतके श्रेष्ठकार्य कोणतेही नसल्याचे विवेकबुवा गोखले यांनी प्रवचनात सांगितले.कुर्तकोटी सभागृहात शरद कुलकर्णी स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित दत्तप्रभूंचे अक्षय ज्ञान आणि त्यांची दिव्य तपस्थळी या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. दत्त हे मूळ तत्त्व समजून घेतले म्हणजे दत्तप्रभूंचा अवतार आणि त्यांच्या कार्याचे महात्म्य उलगडते, असेही बुवांनी नमूद केले. कोणतीही अनुभूती आली की लगेच त्याचा उच्चार करून गवगवा करू नये, असे आपले शास्त्र सांगते. त्याने दोन गोष्टी घडतात. त्या म्हणजे अनुभूती आलेल्याला दुसरी व्यक्ती नमस्कार करते, पण त्यातून त्या व्यक्तीला कोणताचा फायदा होत नाही. तर काही व्यक्ती आपण इतक्या काळापासून साधना करीत असूनही आपल्याला अनुभूती आली नाही, असे म्हणत हताश होतो. त्यातून त्या व्यक्तीचे नुकसान होते. त्यामुळेच अनुभूती ज्याला खऱ्या अर्थाने झाली, तो त्याबाबत कधीच बोलत नाही.
आत्मज्ञान अनुभूती हेच सर्वश्रेष्ठ कार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 00:15 IST
सद्यस्थितीत ज्याला ज्ञान मानले जाते, ते ज्ञान नव्हे. तर आत्मज्ञान हेच खरे ज्ञान असून, ते प्राप्त करण्याइतके श्रेष्ठकार्य कोणतेही नसल्याचे विवेकबुवा गोखले यांनी प्रवचनात सांगितले.
आत्मज्ञान अनुभूती हेच सर्वश्रेष्ठ कार्य
ठळक मुद्देविवेकबुवा गोखले : कुलकर्णी स्मृतिप्रीत्यर्थ व्याख्यानमाला