शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

२५ रोजी इंग्रजी शाळाबंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 00:40 IST

शिक्षण संचालनालयाने आरटीई प्रवेशासाठी २५ फेब्रुवारीपासून अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. परंतु, इंडिपेंडन्ट इंग्लिश स्कू ल असोसिएशन (ईसा) संघटनेशी संलग्नित शाळांनी थकीत फी च्या परताव्याची मागणी करीत २५ फेब्रुवारीलाच शाळाबंद आंदोलनाचा इशारा देऊन अप्रत्यक्षरीत्या शिक्षण विभागाला आव्हान दिले आहे.

ठळक मुद्देशिक्षण विभागाला आव्हान : आरटीई प्रवेश शुल्क अदा करण्याची मागणी

नाशिक : शिक्षण संचालनालयाने आरटीई प्रवेशासाठी २५ फेब्रुवारीपासून अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. परंतु, इंडिपेंडन्ट इंग्लिश स्कू ल असोसिएशन (ईसा) संघटनेशी संलग्नित शाळांनी थकीत फी च्या परताव्याची मागणी करीत २५ फेब्रुवारीलाच शाळाबंद आंदोलनाचा इशारा देऊन अप्रत्यक्षरीत्या शिक्षण विभागाला आव्हान दिले आहे.इंडिपेंडन्ट इंग्लिश स्कूल असोसिएशनची नाशिकमध्ये सोमवारी (दि.११) राज्यस्तरीय बैठक झाली. या बैठकीत शासनाच्या १ नोव्हेंबर २०१८चा शासननिर्णय तत्काळ मागे घेण्यात यावा व २०१२ ते २०१९ या कालावधीत आरटीई कायद्यांतर्गत २५ टक्के आरक्षित जागांवर प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या फी चा परतावा शाळांना तत्काळ मिळावा यासाठी २५ फेब्रुवारीला इंग्रजी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्य शासन आरटीई अंतर्गत दिल्या जाणाऱ्या फी चा परतावा करण्यात अपयशी ठरले असून, १ नोव्हेंबर २०१८ च्या शासन निर्णयामुळे शिक्षण संस्थांवर अनेक जाचक अटी लादल्याचा आरोप करीत ईसाने केला. राज्य सरकार व शिक्षण विभागाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.त्याचप्रमाणे राज्यातील सर्व शाळांसाठी शाळा सुरक्षा कायदा आणावा, १८ नोव्हेंबर २०१३ च्या शासन आदेशात दुरुस्ती करावी, शालेय वाहतुकीसंदर्भात मुख्याध्यापकांऐवजी वाहतूक व्यवस्थापकावर जबाबदारी सोपवावी, स्वयं अर्थसहाय्यित तत्त्वावर दर्जा वाढ प्रस्तावांसाठी आॅनलाइन प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्याची मागणीही यावेळी इंग्रजी शाळाचालकांनी केली आहे. यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र दायमा, प्रदेश सचिव भरत भांदरगे, डॉ. संजय रोडगे, जागृती धर्माधिकारी, राजीव मेंद्दीत्तीवार, डॉ. प्रिन्स शिंदे, श्रीधर श्रीनिवास, विवेक पाडळे, सुखदेव उशीर आदी उपस्थित होते.संस्थाचालकांचा आरोपशिक्षण विभागाच्या अधिकाºयांकडून वारंवार विविध कारणांनी शाळाचालकांना त्रास दिला जात असून, अधिकाºयांचे शाळांमधून विद्यार्थ्यांना दिल्या जाणाºया शिक्षणापेक्षा खासगी शाळांमधून मिळणाºया चिरीमिरीवर अधिक लक्ष असल्याचा आरोपही यावेळी संस्थाचालकांनी केला.

टॅग्स :NashikनाशिकEducation Sectorशिक्षण क्षेत्र