शहरं
Join us  
Trending Stories
1
तो हल्ला रशियाला वाटाघाटी करण्यास भाग पाडेल; शांतता बैठकीच्या एक दिवस आधी हल्ला का केला? झेलेन्स्कींनी सांगितले...  
2
अमेरिका-चीनदरम्यान थांबणार का ट्रेड? अर्धी झाली मालवाहू जहाजांची संख्या, कारण काय?
3
रणजित कासले याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; कोर्टाबाहेर सरकारविरोधात दिल्या घोषणा
4
Astrology: ३ जून रोजी पाच राशींवर होणार मारुतीरायाची कृपा; पैशात होईल दुप्पट वाढ!
5
लश्कर-ए-तोयबा आणि जैश ए मोहम्मदचा भारताविरोधात नवा कट उघड; पाकिस्तान करतंय फंडिंग
6
थरकाप उडवणारी घटना...! ५७ वर्षीय महिलेचे घरमालकाशीच सुरू होते प्रेम प्रकरण, मालमत्ता हडपण्यासाठी जिवंत जाळलं!
7
'मोठ्या घरची राणी, मात्र बदनाम केलं हगवणेंनी..."; फॉर्च्युनर गाडीवरील मजकुराची सोशल मीडियावर चर्चा
8
एक्सने कात टाकली! नवे मॅसेंजिंग फीचर XChat लाँच केले; ऑडिओ, व्हिडिओ कॉलही होणार...
9
Coronavirus: ठाण्यात ४३ वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू, महाराष्ट्रातील मृतांचा आकडा ८ वर
10
क्रिकेट विश्वात एकाच दिवशी दोन धक्के! मॅक्सवेलनंतर आणखी एका स्टार खेळाडूचा क्रिकेटला रामराम
11
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीसमोर नवं आव्हान; सर्वात मोठ्या शत्रू देशाने भारताला दिली ऑफर
12
तीन वेगवेगळ्या संघांना आयपीएल फायनलमध्ये नेणाऱ्या श्रेयस अय्यरचे घर पाहिले का...?
13
S-400 सोबत 'हे' भारतीय शस्त्र असतं, तर फेल झाला असता युक्रेनचा प्रत्येक हल्ला; ऑपरेशन सिंदूरवेळी संपूर्ण जगानं बघितलीय कमाल!
14
सेन्सेक्स-निफ्टी घसरले, पण मिडकॅप आणि बँक शेअर्सची दमदार कामगिरी! तुमची गुंतवणूक सुरक्षित आहे का?
15
Virat Kohli: विराट कोहलीची दहावीची मार्कशीट व्हायरल, त्याला किती मार्क्स मिळाले? पाहा
16
सी सेक्शन सोपं? सुनील शेट्टीच्या वक्तव्यावर गौहर खानचा संताप, म्हणाली, "एका पुरुष सेलिब्रिटी..."
17
Gold Silver Price 2 June: सोन्याच्या दरात पुन्हा मोठी तेजी, पाहा १० ग्रॅमसाठी किती करावा लागणार खर्च?
18
बलुच आर्मीचा पाकिस्तानी आयएसआयवर तगडा वार; महत्वाचा एजंट मुहम्मद हसनीला उडविले...
19
बांगलादेशच्या नोटांवरून हटवला शेख हसीना यांच्या वडिलांचा फोटो, आता देशाच्या चलनावर दिसणार मंदिरे! 
20
गाडी चालवताना झोप लागली अन्...; 'प्रेमाची गोष्ट'मधील मुक्ताचा अपघात, थोडक्यात वाचली अभिनेत्री

अभियंत्यांना मिळणार ओळखचिन्ह

By admin | Updated: July 14, 2014 00:29 IST

अभियंत्यांना मिळणार ओळखचिन्ह

कळवण : डॉक्टर, वकील, फार्मासिस्ट, पोलीस, सीए, या व्यवसायीकांना विशिष्ट ओळखचिन्ह आहे. परंतु अभियंत्यांसाठी मात्र नाही. अभियंत्यांसाठी ओळखचिन्ह मिळावे यासाठी येथील गौरव शिंपी, तुषार पाटील, कुणाल कोठावदे, सचिन शिरुडे यांनी ओळखचिन्ह (लोगो) तयार करून राज्य व केंद्र सरकारकडून मान्यता मिळावी यासाठी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन प्रस्ताव सादर केला आहे. टोपे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. अभियंत्यांसाठी ओळखचिन्ह असावे, अशी संकल्पना कळवण येथील अभियंता विनीत मालपुरे यांना सुचली. त्यानंतर लोगो तयार करण्याचे काम सुरू झाले. गौरव शिंपी, तुषार पाटील, कुणाल कोठावदे, सागर मालपुरे, सचिन शिरुडे यांनी त्यासाठी परिश्रम घेतले. या शिष्टमंडळाने बनविलेल्या ओळखचिन्हाला राज्य व केंद्र सरकारकडून मान्यता मिळण्याची शक्यता आहे. लवकरच अभियंत्यांचे स्वत:चे ओळखचिन्ह पहायला मिळेल. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांना शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनाची प्रत पुढील कारवाईसाठी उच्च व तंत्रशिक्षण प्रधान सचिव यांच्याकडे पाठवण्यात आली आहे . याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनाही देण्यात आले आहे. तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार ए. टी. पवार यांनीही अभियंत्यांसाठी ओळखचिन्ह मिळावे यासाठी विनंती केली आहे. कळवण येथील विनीत देवीदास मालपुरे हा पुणे येथील जेएसपीएम संस्थेच्या राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयात अंतिम वर्ष माहिती तंत्रज्ञान विभागात शिक्षण घेत आहेत. (वार्ताहर)