शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

टीडीआर प्रकरणातील अभियंते रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 00:47 IST

नाशिक : महापालिकेच्या नगररचना विभागातील टीडीआर घोटाळा उघड झाल्यानंतर या प्रकरणात ठरवून महापालिकेची फसवणूक करण्याचा प्रकार असल्याचा आयुक्तांचा संशय असून, त्यामुळे संबंधित अभियंते आयुक्तांच्या रडारवर आहेत. टीडीआर प्रकरणात घोळ झाल्याची विशिष्ट प्रकरणे कोणीही निदर्शनास आणून दिल्यास त्यावर कारवाई करण्याची तयारी केल्याने संबंधित लॉबीत अस्वस्थता निर्माण झाली आहे.

नाशिक : महापालिकेच्या नगररचना विभागातील टीडीआर घोटाळा उघड झाल्यानंतर या प्रकरणात ठरवून महापालिकेची फसवणूक करण्याचा प्रकार असल्याचा आयुक्तांचा संशय असून, त्यामुळे संबंधित अभियंते आयुक्तांच्या रडारवर आहेत. टीडीआर प्रकरणात घोळ झाल्याची विशिष्ट प्रकरणे कोणीही निदर्शनास आणून दिल्यास त्यावर कारवाई करण्याची तयारी केल्याने संबंधित लॉबीत अस्वस्थता निर्माण झाली आहे.वॉक विथ कमिशनर या कार्यक्रमातील एका तक्रारीच्या आधारे आयुक्तांनी टीडीआरचा मोठा घोटाळा उघड केला आणि मोफत दिलेल्या जागेसाठी भरपाई मागण्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर टीडीआरचे प्रमाणपत्र देण्याचे रोखले होते. मोफत जागा मिळूनही त्यांची नोंद सातबारावर न करणे, संबंधित रस्त्यासाठी जागा मिळूनही रस्ता रुंद न करणे, तसेच अगोदरची प्रकरणे न तपासताच टीडीआर देण्यासाठी खरेदी खत करणे हे सर्व षडयंत्र असल्याचे आयुक्तांचे म्हणणे असून, त्यामुळे त्यांनी या प्रकरणाची छाननी केलीआहे. महापालिकेत यापूर्वीही टीडीआर घोटाळे गाजले आहेत. दोनदाभरपाई घेणे, भूखंडावर अतिक्रमण असतानाही त्याचा मोबदला घेणे यांसह अन्य अनेक प्रकरणे घडली आहेत. भूसंपादनामध्येही मोठी साखळी असल्याचेदेखील स्पष्ट झाले आहे.महापालिकेच्या नगररचना विभागातील सावळा गोंधळ लक्षात घेऊन त्यांनी या विभागातील जवळपास सर्वच अभियंते बदललेले आहेत. इतकेच नव्हे तर यापूर्वी कनिष्ठ अभियंत्याकडे शिवारनिहाय काम दिले जात होते, तेदेखील बंद केले आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका