शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भूखंड घोळात अभियंत्यांची साक्ष नोंदवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 00:58 IST

महापालिकेच्या वतीने आकाशवाणी केंद्राजवळील भूखंडाच्या मोबदल्यापोटी २१ कोटी रुपये देण्याच्या प्रकारात लोकप्रतिनिधींना एक माहिती आणि फाइलीवर मात्र दुसरीच माहिती देणाऱ्या अभियंत्यांची साक्ष नोंदवण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.

नाशिक : महापालिकेच्या वतीने आकाशवाणी केंद्राजवळील भूखंडाच्या मोबदल्यापोटी २१ कोटी रुपये देण्याच्या प्रकारात लोकप्रतिनिधींना एक माहिती आणि फाइलीवर मात्र दुसरीच माहिती देणाऱ्या अभियंत्यांची साक्ष नोंदवण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.महापालिकेच्या विकास आराखड्यातील क्रीडांगणासाठी आरक्षित भूखंडापोटी २१ कोटी रुपयांचा मोबदला देण्याचा विषय सध्या गाजत आहे. महापालिका आयुक्तांनी त्यासाठी अधीक्षक अभियंता आणि अतिरिक्तआयुक्तांचा समावेश असलेली द्विसदस्यीय समिती नियुक्त केली आहे. या समितीने नगररचना विभागाकडून कागदपत्रे मागविण्यात आली असून, त्याचा अभ्यास सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे महापालिकेची ही समिती प्रक्रियेचा योग्य की अयोग्य याचा तपास करणार आहे. त्यात काही अभियंत्यांनी महासभेत, स्थायी समितीत किंवा खासगी स्तरावर दिलेली माहितीदेखील तपासली जात आहे.महापालिकेचे प्रभारी आयुक्त म्हणून जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. काम करीत असताना त्यांनी सदरचा धनादेश रात्री ८ वाजता देण्याचे आदेश दिले त्यासंदर्भातील टिप्पणी बदलण्यात आली, असे त्यावेळी औट घटकेचे प्रभारी अधीक्षक अभियंता अग्रवाल यांनी सांगितल्याचे दिनकर पाटील यांनी महासभेत सांगितले होते, तर ५६ कोटी रुपये संबंधित जागामालकाला देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने २०१६ मध्ये दिले. त्यानंतर २९ कोटी रुपये इतकाच मोबदला देण्यात आला.त्यावेळी ज्याप्रमाणे स्थायी समितीवर विषय मांडण्यात आला तसाचप्रस्ताव आताही नियमानुसारस्थायी समितीवर मांडणे आवश्यक होते, असे नगररचना विभागाचे कार्यकारी अभियंता उदय धर्माधिकारी यांनी स्थायी समितीच्या बैठकीतच सांगितले होते. त्यामुळे यांनादेखील चौकशीला बोलविले जाणार आहे. तसेच नगररचना विभागाचे सहायक संचालक सुरेश निकुंभे यांनीदेखील वेळोवळी वेगवेगळी माहिती दिली असल्याने त्यांनादेखील पाचारण केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाfraudधोकेबाजी