शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 00:35 IST

नाशिक : पुणे येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या मूळच्या मालेगाव येथील तरुणाने नाशिकमधील मित्रांच्या खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि़ २) दुपारच्या सुमारास सातपूरच्या सावरकरनगरमध्ये घडली़ भरत तानाजी ठोंबरे (२४, रा. मोरदर टिपे, ता. मालेगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़

ठळक मुद्देमित्रांच्या खोलीमध्ये गळफासभरत तानाजी ठोंबरे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव

नाशिक : पुणे येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या मूळच्या मालेगाव येथील तरुणाने नाशिकमधील मित्रांच्या खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि़ २) दुपारच्या सुमारास सातपूरच्या सावरकरनगरमध्ये घडली़ भरत तानाजी ठोंबरे (२४, रा. मोरदर टिपे, ता. मालेगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरत ठोंबरे हा पुणे येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता़ पुणे येथे जाण्यापूर्वी सातपूर सावरकरनगरमधील मौले हॉलनजीक असलेल्या सोमेश्वर संकुलमध्ये राहणाºया मालेगावच्या मित्रांकडे आला होता़ मालेगाव तालुक्यातील एकाच रूममध्ये राहणारे त्याचे मित्र हे शुक्रवारी सकाळी आपापल्या महाविद्यालयात गेले होते़ दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास महाविद्यालयातून परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला़ भरतने रूमच्या खिडकीस नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला होता़ मयूर ठाकरे या मित्राने त्यास प्रथम जवळील खासगी रुग्णालयात व त्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाºयांनी तपासून मयत घोषित केले़. भरत काही दिवसांपूर्वीच मालेगावी आपल्या घरी गेला होता़ पुण्याला जाण्यापूर्वी तो आपल्या मित्रांना भेटण्यासाठी सातपूर येथील त्यांच्या खोलीवर आल्यानंतर शनिवारी पुण्याला जाणार असल्याचे त्याने मित्रांना सांगितले होते़ मात्र, एक दिवस अगोदरच त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली़ दरम्यान, त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नसून या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या भरत याने आत्महत्येचे पाऊल का उचलले या कारणांचा पोलीस शोध घेत आहेत़