शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

अतिरेकी संघटनेला नाशिकमधून फंडिंग करणाऱ्या संशयित अभियंत्याला अटक, ३१ तारखेपर्यंत एटीएस कोठडी

By संकेत शुक्ला | Updated: January 24, 2024 20:18 IST

Nashik Crime News: आयएसआयएसआय (इसिस) या प्रतिबंधीत दहशतववादी संघटनेतील मृत सदस्यांच्या कुटूंबियांना आर्थिक मदत करणाऱ्या पुरविणाऱ्या संशयित युवकाला दहशतवाद विरोधी पथकाने नाशिकमधून अटक केल्याने खळबळ उडाली आहे.

- संकेत शुक्ल नाशिक - आयएसआयएसआय (इसिस) या प्रतिबंधीत दहशतववादी संघटनेतील मृत सदस्यांच्या कुटूंबियांना आर्थिक मदत करणाऱ्या पुरविणाऱ्या संशयित युवकाला दहशतवाद विरोधी पथकाने नाशिकमधून अटक केल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हा युवक अभियंता असून त्याच्या काही कंपन्याही आहेत. हुजेफ अब्दुल अजीज शेख (३०, रा.एमराल्ड रेसिडेन्सि तिडके कॉलनी नाशिक) असे या संशयित युवकाचे नाव आहे. दहशतवादिवरोधी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्याची चौकशी केली असता त्यात तथ्य आढळल्याने मंगळवारी रात्री त्याला ताब्यात घेण्यात आले.

त्याच्याकडून ७ मोबाईल, तीन सीमकार्ड, लॅपटॉप, पेनड्राईव्ह यांसह काही कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. त्याचे ५ राष्ट्रीयकृत बँकेत खाते असून त्यामार्फत त्याने केलेल्या व्यवहारांची तपासणी केली असता प्रतिबंधीत दहशतवादी संघटनेच्या कुटूंबाला आर्थिक मदत करण्यासाठी मध्यस्थ म्हणून काम करणाऱ्या रबिया उर्फ ओसामा या महिलेच्या खात्यावर ही रक्कम जात असल्याचे निष्पण्ण झाले. बॅटल ऑफ बबूझ म्हणजेच दहशतवादी लढाईत मृत पावलेल्या कुटूंबांच्या बदतीसाठी उभारण्यात आलेल्या संघटनेर्च्फत ही मदत त्या कुटूंबांपर्यंत पोहोचवली जात होती. आज त्याला नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयाने ३१ जानेवारी पर्यँत एटीएस कोठडी दिली.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारीterroristदहशतवादी