शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

पावसाळ्यात ‘नो सेल्फी झोन’ची अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 01:18 IST

पावसाळ्यात निसर्गरम्य ठिकाणी पर्यटकांची होणारी गर्दी व नैसर्गिक वातावरण टिपण्यासाठी आबालवृद्धांना लावलेले वेड व त्यातून जिवघेण्या ठिकाणापर्यंत होणारा शिरकाव पाहता, यंदा पावसाळ्यात धोकादायक ठिकाणी ‘नो सेल्फी झोन’ची अंमलबजावणी करण्यात येणार असून, नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी सज्ज राहण्याच्या सूचना निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी दिल्या आहेत.

नाशिक : पावसाळ्यात निसर्गरम्य ठिकाणी पर्यटकांची होणारी गर्दी व नैसर्गिक वातावरण टिपण्यासाठी आबालवृद्धांना लावलेले वेड व त्यातून जिवघेण्या ठिकाणापर्यंत होणारा शिरकाव पाहता, यंदा पावसाळ्यात धोकादायक ठिकाणी ‘नो सेल्फी झोन’ची अंमलबजावणी करण्यात येणार असून, नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी सज्ज राहण्याच्या सूचना निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी दिल्या आहेत.  जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने मान्सूनपूर्व आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. यंदा पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्यास धरणातून पाणी सोडण्यापूर्वी पाटबंधारे खात्याने नदीपात्रालगतच्या गावांना धोक्याचा इशारा देण्याबरोबरच पोलीस, महसूल, वीज, सार्वजनिक बांधकाम खाते, आरोग्य या खात्याना आगाऊ माहिती द्यावी तसेच नदी, नाल्याच्या पूररेषेत राहणाऱ्यांना आत्तापासूनच सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी तहसीलदार व प्रांत अधिकाºयांना सांगण्यात आले. पावसाळ्यात प्रामुख्याने नैसर्गिक आपत्ती होण्याची अधिक शक्यता असते अशावेळी जीवितहानी टाळण्यासाठी सर्वच यंत्रणांनी आपली जबाबदारी ओळखून एकमेकांशी समन्वय साधण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्य विभागाने मुबलक औषधांचा साठा करून ठेवण्याचे, तर पुरवठा विभागाने पावसाळ्यात संपर्क खंडित होणाºया गावांसाठी पुरेसे अन्नधान्य पावसाळ्यापूर्वी पोहोचविण्याचेही ठरविण्यात आले.  यावेळी सैन्य दलाच्या २१६ मध्य रेजिमेंटचे मेजर राजेश सोनवाल यांनीही मार्गदर्शन केले. पूरग्रस्तांसाठी प्रशासनाच्या समन्वयाने सैन्यदल मदत कार्यासाठी पूरप्रवण भागाची पाहणी करून पूर्वतयारी करेल त्यासाठी लष्कराच्या देवळाली छावणी येथे अत्यावश्यक कक्ष सुरू करण्यात येणार असल्याचे सोनवाल यांनी सांगितले. या बैठकीत आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने तपशिलवार सादरीकरण करण्यात आले. पावसाळ्यात निर्माण होणारी पूर परिस्थिती, वीज पडून होणाºया दुर्घटना, दरड कोसळणे या घटना टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी तसेच जास्त पाऊस होणाºया इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील भाग, दिंडोरी, कळवण, पेठ या भागांतील माहितीही सादर केली. बैठकीस सर्व शासकीय कार्यालयांचे प्रमुख हजर होते.जीवितहानी टाळण्याच्या दृष्टीने महापालिका, तालुका, प्रशासन, पोलीस आदींनी आपत्तीला सामोरे जाण्यासाठी साधन सामग्रीची सज्जता करणे गरजेचे आहे. लाइफजॅकेट, बोटी, फ्लड लाइट आदी साहित्यांच्या उपलब्धतेकडे लक्ष द्यावे तसेच जिल्हा प्रशासनाशी समन्वय राखणे आणि आपत्कालीन परिस्थितीची माहिती देण्यासाठी विभागांनी तसेच तालुका प्रशासनाने आपत्ती नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय