शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मतदार नोंदणीचा सोमवारी शेवट

By admin | Updated: June 29, 2014 00:35 IST

मतदार नोंदणीचा सोमवारी शेवट

 

नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात आलेल्या मतदार नोंदणीच्या विशेष मोहिमेत शनिवारी बहुतांश मतदान केंद्रांवर मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. रविवारीही ही मोहीम सुरूच राहणार असून, सोमवारी अखेरचा दिवस आहे. लोकसभा निवडणुकीत अनेक मतदारांची नावे गहाळ झाल्याने मोठ्या प्रमाणावर आयोगाकडे तक्रारी करण्यात आल्याने त्याची दखल घेत, मतदार पुनरीक्षण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत प्रत्येक विधानसभा मतदारसंघात नव्याने मतदार नोंदणी करण्यात येत असून, त्याचाच भाग म्हणून शनिवार, रविवार या दोन दिवशी प्रत्येक मतदान केंद्रावर विशेष मोहीम राबविण्यात आली. शनिवारी सकाळी दहा वाजेपासून त्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर केंद्रस्तरीय अधिकारी व त्या त्या शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापकांनी हजेरी लावली होती. गेल्या शनिवारी नाव नोंदणीपासून वंचित राहिलेल्या मतदारांनी आज आवश्यक त्या कागदपत्रांसह त्याची पूर्तता केली. काही मतदान केंद्रांवर शुकशुकाट होता, तर काही ठिकाणी दिवसभर मतदारांचा राबता होता. उद्या रविवारीही ही मोहीम सुरू राहणार आहे. सोमवारी मात्र पुन्हा त्या त्या विधानसभा मतदारसंघाच्या मुख्यालयात नाव नोंदणी करण्याची अंतिम मुदत आहे. त्यानंतर मात्र पुरवणी मतदार यादीतच कदाचित ही संधी मतदारांना मिळू शकते.