शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

सराफांचा संप अखेर मागे

By admin | Updated: April 13, 2016 00:23 IST

दुकाने उघडली : लग्नसराईच्या शेवटच्या टप्प्यात ग्राहकांना दिलासा

 नाशिक : केंद्र सरकारने लागू केलेल्या १ टक्का अबकारी कराच्या निषेधार्थ सराफ व्यावसायिक ांचा गेले ४२ दिवसांचा संप मंगळवारी अखेर संपुष्टात आला. अबकारी कराच्या विरोधात सराफांनी पुकारलेला बंद मागे घेण्याचा निर्णय देशभरातील सराफ व्यावसायिकांनी घेतल्याने सोन्याला पुन्हा एकदा झळाळी प्राप्त झाली असून, लग्नसराईच्या अखेरच्या टप्प्यात का होईना सुवर्णकारांची दुकाने उघडल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने सुवर्ण व्यवसायिकांवर लादलेल्या अबकारी कराविरोधात देशभरातील छोटे-मोठे सुवर्णकार आणि ज्वेलर्सनी गेल्या २ मार्चपासून शटर डाउन केलं होतं; मात्र आता सराफांनी नरमाईची भूमिका घेत ग्राहक आणि छोटा व्यापारी व या व्यवसायावर आधारित रोजंदारीवर काम करणाऱ्या कारागिरांचा विचार करून बंद मागे घेत १४ एप्रिलपासून दुकाने उघडणार असल्याचे सराफ संघटनेच्या नेत्यांनी स्पष्ट केले, तर काही व्यावसायिकांनी बंद मागे घेण्याची घोषणा होताच मंगळवारी सकाळी दुकाने उघडली आहेत. सुमारे दीड महिना सुरू असलेल्या या आंदोलन दरम्यान सराफांनी रेल रोको आंदोलन, शहरात मोर्चा काढून, साखळी उपोषण व लाक्षणिक उपोषणासारख्या वेगवेगळ्या मार्गांनी आंदोलन करूनही सुवर्णकारांच्या आंदोलनाची दखल घेतली नाही. आंदोलनाची व्याप्ती वाढविण्याच्या दृष्टीने सराफ व्यावसायिकांसोबतच या व्यवसायाशी संबंधित रोजंदारीवर काम करणारे कारागीर तसेच इतर कामगार कुटुंबीयांसह या मोर्चात सहभागी झाले होते. तरीही केंद्र सरकार कर आकारण्याच्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यामुळे व्यावसायिकांनी अखेर नमते घेत आंदोलनाचे शस्त्र म्यान केले. (प्रतिनिधी)