शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लासलगाव, इगतपुरी येथे वर्षावास समाप्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 00:31 IST

लासलगाव : भारतीय बौद्ध महासभा यशोधरा व रमाई महिला मंडळ यांच्या वतीने लासलगाव राजवाडा येथील बुद्धविहार या ठिकाणी बौद्ध धर्मातील आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या वर्षावास कालावधीमध्ये बुद्ध आणि धर्मग्रंथ वाचन व धम्म प्रवचन कार्यक्रमाचा समारोप झाला.

ठळक मुद्देविपश्यना चार्य भदन्त महास्थवीर यांनी धम्म व विपश्यना या विषयावर उपस्थिताना मार्गदर्शन केले.

लासलगाव : भारतीय बौद्ध महासभा यशोधरा व रमाई महिला मंडळ यांच्या वतीने लासलगाव राजवाडा येथील बुद्धविहार या ठिकाणी बौद्ध धर्मातील आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या वर्षावास कालावधीमध्ये बुद्ध आणि धर्मग्रंथ वाचन व धम्म प्रवचन कार्यक्रमाचा समारोप झाला.वर्षावास कालावधीमध्ये यशोधरा व रमाई महिला मंडळाच्या आरित भालेराव, कांचन साळवे यांनी ग्रंथांचे सविस्तर वाचन करून उपस्थित बांधवांना धम्म ग्रंथाचे महत्त्व समजावून सांगितले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे देशासाठी योगदान, बुद्धमय राजे आदी विषयांवर केंद्रीय शिक्षक दौलतराव गायकवाड, केंद्रीय शिक्षक प्रकाश संसारे, श्यामराव साळवे यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.सरपंच संगीता शेजवळ, प्रा. विजय भालेराव, रमेश कर्डक, दादाजी बागुल, राजेंद्र शेजवळ, तुळसा शेजवळ, निर्मला शेजवळ, सुशीला शेजवळ, रमा शेजवळ, रेखा गायकवाड, शालू गांगुर्डे, विठाई बनसोडे आदी उपस्थित होते. भारती शेजवळ, पद्मा शेजवळ, मनीषा शेजवळ, प्रियंका निरभवणे, आशा शेजवळ, शैला आहिरे, कविता शेजवळ, वैशाली शेजवळ, अविता शेजवळ, प्रीती शेजवळ आदींनी परिश्रम घेतले. आदर्श शिक्षक सूरज झाल्टे यांचा भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने सत्कार करण्यात आला.प्रास्ताविक आरती भालेराव यांनी तर सूत्रसंचलन प्रकाश संसारे, आभार भारती शेजवळ यांनी मानले.इगतपुरीत बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना इगतपुरी : मानव हिताच्या दृष्टीने जगाला शांती व समानतेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांची धम्मसाधना करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर येथील सर्वोदय बुद्धविहारात सामाजिक, धार्मिक, प्रबोधनात्मक तसेच धम्म संघाचे विविध कार्यक्र म राबविण्यात आले. गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या वर्षावास व ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथ वाचनाची सांगता करण्यात आली. यावेळी बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. नगराध्यक्ष संजय इंदूलकर, उपनगराध्यक्ष नईम खान यांच्या हस्ते संविधान स्तंभाचे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी विदर्भ अकोला येथील विपश्यना चार्य भदन्त महास्थवीर यांनी धम्म व विपश्यना या विषयावर उपस्थिताना मार्गदर्शन केले. यावेळी परिसरात बुद्धमूर्तीची स्थापना भदन्त महास्थवीर यांच्या हस्ते विधिवत करून प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी विविध धम्म, सामाजिक, धार्मिक, प्रबोधनात्मक कार्यक्र म झाल्यानंतर भोजनदान, खीरदान करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्र माचे आयोजक सर्वोदय उपासिका संघ, सर्वोदय तरुण मंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर, तसेच बौद्ध उपासक यांनी परिश्रम घेतले. कार्यक्र माचे सूत्रसंचालन बांधकाम सभापती सीमा जाधव यांनी केले.