शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

..अखेर गोदावरी कॉँक्रिटीकरणमुक्त होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2019 00:21 IST

गोदावरी नदीवरील रामकुंडाचे पात्र प्रदूषणमुक्त करण्यासाठी नदीपात्र कॉँक्रीटमुक्त करण्याच्या मागणीला अखेर महापालिका राजी झाली आहे. स्मार्ट सिटी अभियानांतर्गत प्रस्तावित प्रोजेक्ट गोदा प्रकल्पासंदर्भात महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मंगळवारी (दि.३०) स्मार्ट अधिकाऱ्यांसह गोदाघाट परिसराची पाहणी केली.

पंचवटी : गोदावरी नदीवरील रामकुंडाचे पात्र प्रदूषणमुक्त करण्यासाठी नदीपात्र कॉँक्रीटमुक्त करण्याच्या मागणीला अखेर महापालिका राजी झाली आहे. स्मार्ट सिटी अभियानांतर्गत प्रस्तावित प्रोजेक्ट गोदा प्रकल्पासंदर्भात महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मंगळवारी (दि.३०) स्मार्ट अधिकाऱ्यांसह गोदाघाट परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी गोदापात्र कॉँक्रीटमुक्त करण्यास अनुकूलता दर्शवली आहे. सध्या लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सुरू असून, ती शिथिल झाल्यानंतर पुढील कार्यवाही होणार आहे.नाशिक शहरातून वाहणाºया गोदावरी नदीत रामकुंडाच्या ठिकाणी २००२-०३ मध्ये झालेल्या कुंभमेळ्याच्या वेळी कॉँक्रीटीकरण करण्यात येणार असून, त्यामुळे कुंडातील नैसर्गिक नाले बंद झाल्याची नदीप्रेमींची तक्रार आहे. कॉँक्रिटीकरण काढण्याची अनेकदा मागणी झाली आहे, परंतु उपयोग होत नव्हता. आता मात्र स्मार्ट सिटी अभियानांतर्गत प्रोजेक्ट गोदा प्रकल्प राबविण्यात येणार असून, विविध टप्प्यात होणाºया या कामाअंतर्गतच पात्र कॉँक्रिटीकरणमुक्त करण्यात येणार आहे. स्मार्ट सिटी कंपनीने प्रोजेक्ट गोदा अंतर्गत निविदा काढल्या आहेत. प्रोजेक्ट गोदाअंतर्गत रामवाडी पूल ते अहल्यादेवी होळकर पुलापर्यंतच्या गोदापात्रातील गाळ काढण्यात येणार असून, अहल्यादेवी होळकर पूल ते गाडगे महाराज पुलादरम्यानच्या टप्प्यात गोदाघाटाचे सुशोभिकरण केले जाणार आहे.यात गोदापात्रातील कॉँक्र ीट हटवून पात्रातील झऱ्यांचे पुनरुज्जीवन करण्याच्या कामांचाही समावेश आहे. या कामांसाठी निविदाही मागविण्यात आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय तयारीचा भाग म्हणून आयुक्त गमे यांनी आज स्मार्ट कंपनीच्या अधिकाºयांसमवेत गोदाघाटाचा पाहणी दौरा केला.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाgodavariगोदावरीSmart Cityस्मार्ट सिटीcommissionerआयुक्त