शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

‘ब्रह्मोत्सव’ सांस्कृतिक कार्यक्रमाचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 00:32 IST

विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच आपल्या अंगी असणा्नयिा कलागुणांना वाव देऊन विकसित करावे, असे प्रतिपादन नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी केले. बह्मा व्हॅली शैक्षणिक संकुलात आयोजित ब्रह्मोत्सव - २०२० या कला, सांस्कृतिक कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

ठळक मुद्देअंजनेरी : विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या आविष्काराला रसिकांनी दिली दाद

त्र्यंबकेश्वर : विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच आपल्या अंगी असणा्नयिा कलागुणांना वाव देऊन विकसित करावे, असे प्रतिपादन नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी केले. बह्मा व्हॅली शैक्षणिक संकुलात आयोजित ब्रह्मोत्सव - २०२० या कला, सांस्कृतिक कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.नाशिक ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित ब्रह्मोत्सव - २०२० चा समारोप नांगरे पाटील व अ‍ॅग्रिकल्चर हेड फॉर एशिया अमेरिकन अ‍ॅम्बेसी नवी दिल्लीचे डॉ.मुरली बांदला यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी पार पडला. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, माधव चव्हाण, ज्ञानेश्वर चव्हाण आदी उपस्थित होते. नांगरे पाटील पुढे म्हणाले, बालवयातच ज्ञानेश्वरीसारख्या ग्रंथाचे जीवनात अनुकरण केल्यास आज समाजात घडणाऱ्या वाईट घटना कमी होतील, असे मत त्यांनी व्यक्त केले. कठोर परिश्रम केल्यास यश नक्कीच मिळते, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी आपल्या कॉलेज जीवनातील काही गमतीदार प्रसंग सांगून मुलांना खळखळून हसविले. डॉ.मुरली बांदला यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.संस्थेचे सरचिटणीस गौरव पानगव्हाणे, संचालक प्रभावती पानगव्हाणे यांनी स्वागत केले. विनायक निखाडे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. यावेळी विजय वाघ, सुनीता वाघमारे, चंद्रकांत शिरसाठ, वैशाली सोनवणे, रमेश जोशी, मनीषा शिंदे, संचालक विजय तांबे, रजिस्ट्रार समाधान पगार आदींसह पालक उपस्थित होते.तेजा देवकर यांची भेटब्रह्मा व्हॅली शैक्षणिक संकुलातील विविध विद्याशाखांतील विद्यार्थ्यांना कला-क्र ीडा, शैक्षणिक व इतर क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल नांगरे पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले. मराठी सिनेअभिनेत्री तेजा देवकर यांनी भेट दिली व नृत्यकला सादर करून वाहवा मिळवली. पदान्यासाने त्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. विद्यार्थ्यांनी कलाविष्कार सादर केला.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रcultureसांस्कृतिक