शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

त्रिमूर्ती चौक परिसरात अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 00:44 IST

महापालिकेच्या वतीने सिडकोतील त्रिमूर्ती चौकातील रहदारीस अडथळा ठरणारे अतिक्रमण काही महिन्यांपूर्वी काढले होते. परंतु याठिकाणी पुन्हा अतिक्रमण झाल्याने वाहनधारकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सिडको : महापालिकेच्या वतीने सिडकोतील त्रिमूर्ती चौकातील रहदारीस अडथळा ठरणारे अतिक्रमण काही महिन्यांपूर्वी काढले होते. परंतु याठिकाणी पुन्हा अतिक्रमण झाल्याने वाहनधारकांनी नाराजी व्यक्त केली आहे.महापालिकेच्या वतीने गेल्या काही महिन्यांपूर्वी सिडको भागातील रहदारीस अडथळा ठरणारे मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची धडक मोहीम राबविली होती. या मोहिमेत मनपाने दिव्या अ‍ॅडलॅब, दुर्गानगर फे्रशअप बेकरीसमोरील तसेच उत्तमनगर ते विजयनगर रस्त्यासह सुमारे दोनशेहून अधिक व्यावसायिकांचे अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात हटविले होते. अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविल्याने मुख्य रस्ते मोकळे झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले होते. महापालिकेच्या वतीने विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही महिन्यांपूर्वी सिडको भागातील मुख्य चौक व रस्त्यांचे अतिक्रमण काढण्याची धडक मोहीम सुरू केली होती. या मोहिमेत सुरुवातील मनपाने त्रिमूर्ती चौक येथील मुख्य रस्त्याला अडथळे ठरणारे अतिक्रमण काढले. दिव्या अ‍ॅडलॅब परिसरातून अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली. मात्र यानंतर याठिकाणी दाखल झालेले सिडकोचे तत्कालीन प्रशासक अनिल झोपे यांनी दिव्या अ‍ॅडलॅब दुकानाबाहेरील अतिक्रमण करण्यात आलेली जागा ही सार्वजनिक असल्याचे स्पष्टीकरण दिल्यानंतर मनपाने याठिकाणचे अतिक्रमण हटविले होते. यानंतर मनपाने आपला मोर्चा दुर्गानगर फ्रेशअप बेकरीसमोरील दुकानांकडे वळविला. यावेळी येथील मुख्य रस्त्याला अडथळा ठरणाऱ्या पंचवीसहून अधिक व्यावसायिकांचे अतिक्रमण हटविले होते. तसेच यानंतर ही मोहीम उत्तमनगर ते विजयनगर या भागात राबविण्यात आली होती. परंतु याठिकाणी आज पुन्हा अतिक्रमण झाल्याचे दिसून येत असून, मनपाने येथील मुख्य रस्त्याला अडथळा ठरणारे अतिक्रमण काढण्याची मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.स्वत:हून काढले होते अतिक्रमणगेल्या अनेक वर्षांपासून असलेले अतिक्रमण मनपाने काढल्यानंतर रस्ते मोकळे झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले होते. मनपाच्या वतीने अतिक्रमण काढण्यास सुरुवात केल्यानंतर परिसरातील अन्य दुकानदारांनी स्वत:हून आपले अतिक्रमण हटवित असल्याचे दिसून आले. परंतु आज पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती झाल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.महिला व बालक बचावलेगेल्या मंगळवारी (दि.२३) सायंकाळच्या सुमारास एक महिला दुचाकीवरून मुलाला घेऊन जात असताना त्रिमूर्ती चौक येथून वळताना मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झाल्याने महिला दुचाकीवरून खाली पडली. यावेळी सुदैवाने त्यातून ती बचावली. या भागात अशा दुर्घटना वारंवार घडतात.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका