शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

देवळाली कॅम्पला अतिक्रमण हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 00:19 IST

छावणी परिषदेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने वडनेररोड येथील शिवसेना कार्यालयासह दोन अनधिकृत दुकान व हॉटेलचे स्वच्छतागृह जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त करण्यात आले.

देवळाली कॅम्प : छावणी परिषदेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने वडनेररोड येथील शिवसेना कार्यालयासह दोन अनधिकृत दुकान व हॉटेलचे स्वच्छतागृह जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त करण्यात आले.  छावणी परिषदेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने शुक्रवारी दुपारी वडनेररोड येथील हॉटेल शारदाजवळील प्रमोद मोजाड यांचे पत्र्याचे शिवसेना कार्यालय जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त करण्यात आले. तसेच शेजारील दोन अनधिकृत रेडिमेड कपडे विक्रीचे पत्र्याचे दुकानदेखील जमीनदोस्त करण्यात आले. तसेच हिरा हॉटेलचे अनधिकृत पाठीमागील स्वच्छतागृहदेखील जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त करण्यात आले. छावणी प्रशासनाकडून संबंधित अनधिकृत दुकानदारांना यापूर्वीच नोटिसा देण्यात आल्या होत्या.कडेकोट पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण विरोधी मोहीम छावणी प्रशासनाने सुरू केल्याने अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहे. छावणी प्रशासनाकडून ज्यांना अतिक्रमण काढून घेण्याबाबत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत त्यांनी आपले अतिक्रमण स्वत:हून काढून घेण्यास सुरुवात केली आहे. सिंधी पंचायत कार्यालयासमोरील अतिक्रमणधारकास अतिक्रमण काढून घेण्यासाठी ६ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आल्याचे अतिक्रमण विभागाचे आर. सी. यादव यांनी सांगितले. या अतिक्रमण मोहिमेत एक जेसीबी, दोन वाहन वीस कर्मचारी सहभागी झाले होते.छावणी प्रशासनाकडे तीन नगरसेवकांच्या अतिक्रमणाबाबत तक्रार करण्यात आली होती. छावणी परिषदेच्या तत्कालीन अध्यक्षांनी संबंधित नगरसेवकांशी पत्रव्यवहार करून खुलासा मागवण्यात आला होता. मात्र तत्कालीन अध्यक्षांच्या बदलीनंतर त्याकडे छावणी प्रशासनाने दुर्लक्ष केल्याची चर्चा रंगली होती. ज्या तीन नगरसेवकांचे अतिक्रमण आहे त्यांचे नगरसेवक पद रद्द करावे म्हणून पराभूत उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतली आहे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणNashikनाशिक