शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
4
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
5
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
7
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
8
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
9
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
10
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
11
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

बोकटे येथे यात्रेच्या राखीव जागेवर अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 01:04 IST

अंदरसूल : जिल्ह्यातील श्रीक्षेत्र बोकटे येथे भगवान श्री काल भैरवनाथाच्या सालाबादप्रमाणे भरणाऱ्या यात्रेच्या राखीव जागेवर झालेले अतिक्रमण न हटविल्यास येत्या १५ मार्चपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा परिसरातील ग्रामस्थांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे.

ठळक मुद्देग्रामपालिकेचे दुर्लक्ष : ग्रामस्थांचा उपाेषणाचा इशारा

अंदरसूल : जिल्ह्यातील श्रीक्षेत्र बोकटे येथे भगवान श्री काल भैरवनाथाच्या सालाबादप्रमाणे भरणाऱ्या यात्रेच्या राखीव जागेवर झालेले अतिक्रमण न हटविल्यास येत्या १५ मार्चपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा परिसरातील ग्रामस्थांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे.यात्रेसाठी ठिकठिकाणांहून विविध व्यावसायिक येत असतात. बोकटे ग्रामपंचायतीने त्यांना जागा उपलब्ध केली होती. मात्र, त्या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने यात्रेसाठी असणारी राखीव जागा पूर्णपणे व्यापली गेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात यात्रेच्या जागेची मोठी समस्या निर्माण झाली आहे. सदर घटनेकडे बोकटे ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत असल्याने शासकीय जागेवर झालेले अतिक्रमण त्वरित हटवावे अशी मागणी बोकटे, देवळाणे, दुगलगाव येथील भाविक व ग्रामस्थांनी केली आहे.याप्रकरणी ग्रामपंचायतीला निवेदन देण्यात आले असून त्यात सीताराम दाभाडे, रावसाहेब लासुरे, गोरख काळे, सकाहरी दाभाडे, संदीप साळवे, सोमनाथ दाभाडे, संभाजी दाभाडे, प्रकाश दाभाडे, रामनाथ दाभाडे आदींच्या स्वाक्षऱ्यांसह देवळणे,दुगलगाव ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच यांचे पाठिंबा असलेले पत्र जोडण्यात आले आहे. सदर निवेदन सरपंच प्रताप दाभाडे व ग्रामसेवक मोरे यांना देण्यात आले.बोकटे ग्रामपंचायत यात्रेसाठी जागा देऊ शकत नसेल आणि भाविकांची गैरसोय होत असेल तर ट्रस्ट करण्यासह देवळाणे गावात यात्रा भरविण्यास परवानगी द्यावी.- गोरख काळे,उपसरपंच, देवळाणे.येवला तालुक्यातील विद्यमान आमदार व जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी याप्रकरणी लक्ष घालावे व असंख्य भाविकांना न्याय मिळवून द्यावा.- रावसाहेब लासुरे, सरपंच, दुगलगाव

 

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतSocialसामाजिक