शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
4
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
5
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
6
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
7
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
8
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
9
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
11
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
12
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
13
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
14
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
15
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
16
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
17
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
18
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
19
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
20
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी

, खुल्या जागांवर झालेले अतिक्रमण

By admin | Updated: December 9, 2014 01:46 IST

, खुल्या जागांवर झालेले अतिक्रमण

नाशिक : महापालिकेच्या मिळकतींमध्ये पोटभाडेकरू, खुल्या जागांवर झालेले अतिक्रमण, समाजोपयोगी शिर्षकाखाली पालिकेच्या इमारतींमध्ये व्यावसायिक कारणांसाठी होणारा वापर याबाबत सर्व संस्था-व्यावसायिकांची चौकशी करण्याचे आणि संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी महापालिकेच्या महासभेत संबंधित अधिकाऱ्यांना दिला. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशानंतर पालिकेच्या बांधीव मिळकती व खुल्या जागांसंबंधी झालेल्या चर्चेनंतर महापौर अशोक मुर्तडक यांनी मिळकतींसंबंधी प्रारूप नियमावली तयार करून गटनेत्यांच्या बैठकीत तिला अंतिम स्वरूप देण्याचा निर्णय जाहीर केला. महापालिकेच्या बांधीव मिळकती व खुल्या जागांबाबत मुंबई उच्च न्यायालयात अ‍ॅड. बाळासाहेब चौधरी यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी होताना न्यायालयाने अंतरिम आदेश काढत पालिकेला त्यासंबंधी नियमावली तयार करण्याची सूचना केली. त्यानुसार महासभेत पालिकेच्या मिळकतींसंबंधी साधक-बाधक चर्चा झाली. उपमहापौर गुरुमित बग्गा यांनी चर्चेला सुरुवात करताना सांगितले, पालिकेच्या मिळकतींबाबत नियमावली असलीच पाहिजे; परंतु ज्या इमारतींमध्ये समाजोपयोगी अभ्यासिका, व्यायामशाळा, वाचनालये यासारखे उपक्रम राबविले जातात त्यांच्या समर्थनार्थ पालिकेने न्यायालयात बाजू मांडली पाहिजे. महापालिकेने अधिनियम ६१ व ६३ नुसार न्यायालयात बाजू मांडली असती तर न्यायालयाचा असा निर्णय येऊच शकला नसता. पालिकेने व्यावसायिक वापर करणाऱ्या संस्थांवर जरूर कारवाई करावी. पालिकेने न्यायालयात सक्षमपणे बाजू मांडावी, अन्यथा संस्थांना सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागतील, असेही बग्गा यांनी सांगितले. सुरेखा भोसले, लक्ष्मण जायभावे, उद्धव निमसे, राहुल ढिकले, शोभना शिंदे, यतिन वाघ, शाहू खैरे, प्रा. कुणाल वाघ, संजय चव्हाण, शिवाजी गांगुर्डे, माणिक सोनवणे, यशवंत निकुळे, संदीप लेनकर, सुधाकर बडगुजर, प्रकाश लोंढे, कविता कर्डक, अजय बोरस्ते, शशिकांत जाधव आदिंनी सेवाभावी संस्थांना बाजारमूल्यानुसार भाडेआकारणी न करण्याची मागणी करतानाच व्यावसायिक कारणांसाठी वापर करणाऱ्या संस्था तसेच पोटभाडेकरू भरणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली. चर्चेनंतर महापौर मुर्तडक यांनी सांगितले, मनपाच्या मिळकतींचा व्यावसायिक दृष्टिकोनातून वापर करणाऱ्या संस्थांवर तसेच पोटभाडेकरू आढळल्यास संबंधितांवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी. मनपा अधिनियम ६३ व ६१ ची माहिती उच्च न्यायालयात सादर करावी. ज्या संस्थांकडून लग्नसमारंभासाठी अथवा विविध कारणांकरिता व्यावसायिक वापर होत असेल तसेच भिन्न प्रकारची दर आकारणी होत असेल तर त्यांचा सर्वे करून त्यांच्याकडून प्रचलित बाजारमूल्यानुसार पैसे वसूल करावेत. मात्र हे करत असताना ज्या सेवाभावी संस्था पारदर्शीपणे समाजोपयोगी कामे करत असतील त्यांना बाजारमूल्यानुसार दर आकारणी करू नये. नवीन नियमावली तयार करताना सेवाभावी संस्थांच्या करारात पालिका व संस्था असा संयुक्त प्रकल्प म्हणून उल्लेख करावा. मिळकतींबाबत प्रारूप नियमावली तयार करून गटनेत्यांच्या बैठकीत सादर करून तिला अंतिम रूप दिले जाईल, असेही महापौरांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)