नाशिक : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पूर्व भागातील वडाळारोड, पखालरोड परिसरातील अनधिकृत बांधकाम हटविण्याची मोहीम राबविली. यावेळी सामासिक अंतरात उभारण्यात आलेले पक्के बांधकाम उद्ध्वस्त करण्यात आले.अतिक्रमण विभागामार्फत गेल्या आठ-दहा दिवसांपासून शहरातील अनधिकृत बांधकामांवर हातोडा उगारला जात आहे. मंगळवारी पूर्व विभागात कारवाई करण्यात आली. अतिक्रमणविरोधी पथकाने वडाळारोडवरील रेहनुमानगर येथील सुग्रा पार्क या ठिकाणी अॅड. अन्सार सय्यद यांनी कार्यालयासाठी उभारलेले अनधिकृत बांधकाम हटविले. तसेच गयास रफीक शेख यांच्या पक्क्या बांधकामावरही जेसीबी चालविण्यात आला. भाभानगर, पखालरोड परिसरातील शेल्टर पार्क या इमारतीच्या सामासिक अंतरात हाजी अय्युबखान युसुफखान यांनी खोलीचे केलेले पक्के बांधकाम, पंप रूमच्या जागेत किचनचे केलेले बांधकाम आणि लोखंडी पत्र्याचे पक्के शेडही पथकाने उद्ध्वस्त केले. यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता.
अतिक्रमण हटविले
By admin | Updated: December 1, 2015 23:48 IST