शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

देवळालीगाव येथील गोठ्यांचे अतिक्र मण हटवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 00:02 IST

रोकडोबावाडी, देवळालीगाव येथील चार गोठेधारकांचे नळ व ड्रेनेज लाइन यांचे कनेक्शन महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने तोडले. गेल्याच आठवड्यात सिन्नरफाटा  येथे, अशी कारवाई करण्यात आली होती.

नाशिकरोड : रोकडोबावाडी, देवळालीगाव येथील चार गोठेधारकांचे नळ व ड्रेनेज लाइन यांचे कनेक्शन महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने तोडले. गेल्याच आठवड्यात सिन्नरफाटा  येथे, अशी कारवाई करण्यात आली होती.सुरेश बिडवे, सिद्धाप्पा औशिकर, मानकू औशिकर आणि संपत पवार यांचे गोठ्याचे पत्र्याचे शेड आज हटविण्यात आले. ही कारवाई महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, अतिरिक्त आयुक्त हरिभाऊ फडोळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपआयुक्त रोहिदास बहिरम, उपअभियंता नीलेश साळी, एम. डी. पगारे, पशुवैद्यकीय अधिकारी पी. एम. सोनवणे, नगरनियोजन विभागाचे अभियंता गरु ड यांनी केली.अतिक्रमण विभागाची सहा पथके व दैनंदिन अतिक्र मण निर्मूलन पोलीस यांनी कारवाईत भाग घेतला. पूर्वपरवानगी न घेता रहिवासी क्षेत्रांमध्ये अनधिकृतपणे गोठे उभारणाऱ्या व्यावसायिकांना महापालिकेने नोटिसा बजावून तातडीने गोठे शहराच्या हद्दीबाहेर स्थलांतरित करण्याबाबत कळविले आहे. ज्यांनी अद्यापि गोठे स्थलांतरित केलेले नाहीत, त्यांनी तातडीने ते स्थलांतरित करावेत अन्यथा कोणत्याही क्षणीगोठे हटविण्याची कारवाई केली जाईल, असे महापालिकेने कळविले आहे.संबंधितांचे वीज, ड्रेनेज व पाण्याचे कनेक्शन बंद केले जाईलच. परंतु, गोठे हटविण्यासाठी येणारा खर्च वसूल केला जाईल तसेच पोलीस ठाण्यात गुन्हेही दाखल करण्यात येतील, असे महापालिकेने कळविले आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाEnchroachmentअतिक्रमण