शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

विक्रेत्यांनी बळकावलेली जागा दोन तासांत रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 01:32 IST

सातपूर गावातील श्री छत्रपती शिवाजी महाराज मंडईतील भाजीविक्रेत्यांनी प्रमाणापेक्षा अधिक जागा बळकावून त्यावर साठवलेला भाजीपाला महानगरपालिकेने पोलीस बंदोबस्तात जप्त करीत जागा मोकळी करून घेतली. या मोकळ्या केलेल्या जागेवर मंडईबाहेरील विक्रेत्यांना जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यावेळी तीन ट्रक माल जप्त करण्यात आला.

ठळक मुद्देसातपूर : तीन ट्रक माल महापालिकेकडून जप्त

सातपूरगावातील श्री छत्रपती शिवाजी मंडईतील विक्रेत्यांनी अतिरिक्त जागेवर ठेवलेला भाजीपाला पोलीस बंदोबस्तात जप्त करताना महापालिका कर्मचारी.सातपूर : सातपूर गावातील श्री छत्रपती शिवाजी महाराज मंडईतील भाजीविक्रेत्यांनी प्रमाणापेक्षा अधिक जागा बळकावून त्यावर साठवलेला भाजीपाला महानगरपालिकेने पोलीस बंदोबस्तात जप्त करीत जागा मोकळी करून घेतली. या मोकळ्या केलेल्या जागेवर मंडईबाहेरील विक्रेत्यांना जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यावेळी तीन ट्रक माल जप्त करण्यात आला.गेल्या अनेक दिवसांपासून मंडईच्या आतील आणि बाहेरील भाजीविक्रेत्यांमध्ये वाद सुरू आहे, तर मंडईबाहेरील रस्त्याच्या कडेला बसलेल्या अनधिकृत विक्रेत्यांना हटवून रस्ता मोकळा करावा, अशी ग्रामस्थांची सततची मागणी आहे. महापालिका प्रशासनाकडून वेळोवेळी धडक मोहीम राबवून कारवाई करण्यात आली आहे. वेळोवेळी सांगूनही ऐकत नसल्याने गुरुवारी विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्तात धडक मोहीम राबविण्यात आली. मंडईतील भाजीविक्रेत्यांनी निश्चित केलेल्या जागेव्यतिरिक्त वाढीव जागेवर कब्जा करत भाजीपाला साठवून ठेवलेला होता. तो सर्व भाजीपाला जप्त करण्यात आला. यावेळी विक्रेत्यांनी विरोध करीत वाद घातला. परंतु पोलिसांनी वाद मोडून काढलाआणि जागा खाली करण्यास सांगण्यात आले.यावेळी विक्रेत्यांनी दोन तासांचा वेळ मागून घेतला. दुपारनंतर बहुतांश विक्रेत्यांनी जागा खाली करून दिल्याने मनपा कर्मचाऱ्यांनी ठरवून दिलेल्या विक्रेत्यांना जागेवर बसण्यास सांगण्यात आले. जवळपास तीन ट्रक माल जप्त करण्यात आला.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाEnchroachmentअतिक्रमण