शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

महिलांचे सबलीकरण काळाची गरज : परुळेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 00:58 IST

महिलांचे आर्थिक सबलीकरण झाल्यास त्यांचे परावलंबित्व दूर होऊन त्या सक्षम होतील तसेच स्वयंविकासातून कौटुंबिक विकासही साधतील, असा विश्वास स्वयंसिद्धा प्रकल्पाच्या संचालिका कांचन परुळेकर यांनी व्यक्त केला असून, समाजाच्या विकासासाठी महिलांचे आर्थिक सबलीकरण करणे काळाची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

नाशिक : महिलांचे आर्थिक सबलीकरण झाल्यास त्यांचे परावलंबित्व दूर होऊन त्या सक्षम होतील तसेच स्वयंविकासातून कौटुंबिक विकासही साधतील, असा विश्वास स्वयंसिद्धा प्रकल्पाच्या संचालिका कांचन परुळेकर यांनी व्यक्त केला असून, समाजाच्या विकासासाठी महिलांचे आर्थिक सबलीकरण करणे काळाची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.  गोदाघाटावरील नाशिक वसंत व्याख्यानमालेत रविवारी (दि. २७) कांचन परुळेकर यांनी सत्ताविसावे पुष्प गुंफले. निर्मला केशव गरुड यांच्या स्मृतीत महिलांचे आर्थिक सबलीकरण विषयावर व्याख्यान देताना त्यांनी महिलांना स्वयंविकास व स्वयंरोजगाराविषयी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, सद्य:स्थितीत आर्थिक विकास हा धर्म झाला असल्याने महिलांनी आत्मभान, आत्मनिर्भरता आणि स्वावलंबनाची कास धरून भविष्याचा वेध घेतला पाहिजे. आर्थिक सक्षमीकरणासाठी महिलांनी स्वत:च पुढाकार घेणे गरजेचे आहे. शासनाने महिलांसाठी विविध क्षेत्रांत आरक्षण दिले असले तरी पंचायत राजमध्ये महिलांच्या आरक्षित जागांवर ७५ टक्के पुरुषच कार्यभार पाहत आहेत. महिलांच्या सबलीकरणात हा सर्वांत मोठा अडसर असून, महिलांनी आत्मनिर्भर हाणे गरजेचे आहे. समाजातील पुरु षांचे सबलीकरण झाले आहे. त्या तुलनेत महिलांचे सबलीकरण झालेले नाही. त्यासाठी संधीची वाट पाहण्याऐवजी महिलांनी स्वत:च संधी निर्माण करून त्याचे सोने करावे. पुरु षांनीही त्यासाठी सहकार्य करणे गरजेचे आहे. आई उद्योजक झाली, तर पुढची पिढी उद्योजक बनते, हे लक्षात घेऊन महिलांनी वाटचाल करणे गरजेचे असल्याचे सांगत त्यांनी महिलांनी उद्योग व्यवसायात उतरण्याचे आवाहन केले.आजचे व्याख्यान ,  विषय : कॉर्पोरेट कर्मयोग,  वक्ते : भावार्थ रामचंद्र देखणे

टॅग्स :Nashikनाशिक