शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

महिला व मुलांच्या सक्षमीकरणासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 00:22 IST

स्त्रीशिकली, प्रगती झाली’ या उक्तीप्रमाणे एक सुशिक्षित स्त्री आपले घरच नाही तर समाजालासुद्धा सुशिक्षित, सुसंस्कृत बनवते. याचा प्रत्यय आपल्याला ‘दिशा प्रतिष्ठान’च्या कामकाजाकडे बघितल्यावर आल्याशिवाय रहात नाही. आपले दैनंदिन काम, नोकरी व्यवसाय, कौटुंबिक जबाबदाºया आदींमधून वेळ काढून काहीतरी वेगळे करावे, अशा अंतरिक तळमळीतून शिल्पा पारख यांच्या पुढाकाराने व संकल्पनेतून दिशा प्रतिष्ठानचा जन्म झाला.

दिशा  प्रतिष्ठानपरिचय महिला संस्थांचास्त्रीशिकली, प्रगती झाली’ या उक्तीप्रमाणे एक सुशिक्षित स्त्री आपले घरच नाही तर समाजालासुद्धा सुशिक्षित, सुसंस्कृत बनवते. याचा प्रत्यय आपल्याला ‘दिशा प्रतिष्ठान’च्या कामकाजाकडे बघितल्यावर आल्याशिवाय रहात नाही. आपले दैनंदिन काम, नोकरी व्यवसाय, कौटुंबिक जबाबदाºया आदींमधून वेळ काढून काहीतरी वेगळे करावे, अशा अंतरिक तळमळीतून शिल्पा पारख यांच्या पुढाकाराने व संकल्पनेतून दिशा प्रतिष्ठानचा जन्म झाला. जानेवारी २०१६ पासून समाजातील वंचित घटकांच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी विविध स्तरावर सुधारणा घडवून आणण्याचे काम दिशाने हाती घेतले. शहरातील समविचारी, समव्यावसायिक महिला एकत्र येऊन या संस्थेच्या छताखाली काम करत आहेत. महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती व त्यांच्या सर्वांगीण गुणवत्ता वाढीसाठी त्या त्या शाळांमधील शिक्षकांच्या सहकार्याने एक कार्यक्रम ठरविण्यात आला. या विद्यार्थ्यांची उपस्थिती, त्यांचा अभ्यास, त्यांचे आरोग्य आदींवर संस्थेच्या सदस्यांनी वैयक्तिकरीत्या लक्ष देऊन पाहणी करून अहवाल बनविला. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसाठी विशेष प्रयत्न करणाºया शिक्षकांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन दिले.  विद्यार्थ्यांना वाढत्या वयातील बदल, चांगले-वाईट स्पर्श आदींविषयी मार्गदर्शन केले. याशिवाय या विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळावा यासाठीही व्यासपीठ उपलब्ध करून दिले. या विद्यार्थ्यांचे कलागुण वाढविण्यास मदत करणाºया २४ मुख्याध्यापक, आदर्श शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. महिला सक्षमीकरणासाठीही ‘दिशा’ने वेळोवेळी विविध उपक्रम राबविले. ‘दिशा’च्या छताखाली आज शिल्पा पारख यांच्याबरोबर संगीता बेदमुथा, आरती नहार, दर्शना सराफ, समता सुराणा, दर्शना आंबेकर, सोनम टाटिया आदी सख्या कार्यरत असून, भविष्यात निरनिराळे समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा त्यांना मानस आहे.