शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

फेरीवाल्यांचा पालिकेवर ‘रोजगार बचाव’ मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 01:20 IST

‘स्मार्ट सिटीची घाई, गरिबांच्या पोटावर पाय देई’, ‘ग्राहक तेथे हॉकर्स झोन झालेच पाहिजेत’ अशा घोषणा देत हॉकर्स व टपरीधारक युनियनच्या माध्यमातून शहरातील फेरीवाल्यांनी शुक्रवारी (दि.२३) महापालिका मुख्यालयावर ‘रोजगार बचाव’ मोर्चा काढला. यावेळी, महापालिकेने सुरू केलेल्या अतिक्रमण विरोधी कारवाईचा निषेध करण्यात येऊन कारवाई थांबविण्याची मागणी करण्यात आली. सकाळी भद्रकाली मार्केटपासून मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने फेरीवाले सहभागी झाले होते.

नाशिक : ‘स्मार्ट सिटीची घाई, गरिबांच्या पोटावर पाय देई’, ‘ग्राहक तेथे हॉकर्स झोन झालेच पाहिजेत’ अशा घोषणा देत हॉकर्स व टपरीधारक युनियनच्या माध्यमातून शहरातील फेरीवाल्यांनी शुक्रवारी (दि.२३) महापालिका मुख्यालयावर ‘रोजगार बचाव’ मोर्चा काढला. यावेळी, महापालिकेने सुरू केलेल्या अतिक्रमण विरोधी कारवाईचा निषेध करण्यात येऊन कारवाई थांबविण्याची मागणी करण्यात आली.सकाळी भद्रकाली मार्केटपासून मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने फेरीवाले सहभागी झाले होते. त्यात महिला फेरीवाल्यांची संख्या लक्षणीय होती. हाती घोषणाफलक घेत सदर मोर्चा महापालिकेच्या प्रवेशद्वारावर येऊन धडकला. यावेळी, महापालिकेने सुरू केलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली. सदर मोहीम तातडीने बंद करावी, मोहिमेत जप्त झालेला माल ताबडतोब परत मिळावा, फेरीवाला झोनबाबत युनियनने सुचविलेल्या पर्यायांचा विचार करावा, पोलीस बळाचा वापर थांबवण्यात यावा आदी मागण्या यावेळी मांडण्यात आल्या. युनियनचे अध्यक्ष शांताराम चव्हाण यांनी फेरीवाला समितीच्या मंजुरीशिवाय झालेल्या ठरावाला स्थगिती देण्याची मागणी केली. तसेच हॉकर्स नोंदणी व शुल्क वसुलीबाबत समितीत चर्चा करूनच निर्णय घेण्याची सूचना करण्यात आली. या आंदोलनात सुनील संधानशिव, जावेद शेख, पुष्पाबाई वानखेडे, नवनाथ लव्हाटे, चंद्रकला पारवे, जया पाटील, पांडुरंग बडगुजर, संजय बर्वे, चित्रा मुसमाडे आदी सहभागी झाले होते.आयुक्तांच्या भेटीसाठी ठिय्यासकाळी मोर्चा येऊन धडकल्यानंतर फेरीवाल्यांचे शिष्टमंडळ शांताराम चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या भेटीसाठी गेले. मात्र, आयुक्तांनी वेळ नसल्याचे सांगत दुपारी ४ वाजता भेटीची वेळ दिली. त्यामुळे, शिष्टमंडळ माघारी फिरले आणि आयुक्तांची भेट होईस्तोवर त्यांनी प्रवेशद्वाराच ठिय्या मांडला.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका